लातूर: येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ जून २०२५ रोजी दुपारी ४.१५ वाजता युगंधर सोसायटी येथील राम मंदिरासमोर घडली. पोलिसांनी आरोपी शहजादी मुजीब शेख (रा. लातूर) हिच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण), शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान, गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका विराज पाटील (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या राम मंदिरात दर्शनासाठी गेल्या असताना शहजादी शेख यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या लोकांनाही तिने शिवीगाळ केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवले.
यानंतर राधिका पाटील त्यांच्या स्कूटरकडे परतत असताना, आरोपी शहजादी शेखने त्यांच्या अंगावर आपली मारुती अल्टो कार (क्रमांक MH24V 8394) घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडीओ फुटेज देखील समोर आले असून, त्यात राधिका पाटील गाडीच्या बोनेटला धडकून रस्त्यावर पडल्याचे आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेनंतर राधिका पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे, मात्र घटनेनंतर आरोपी शहजादी शेख फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
Leave a Reply