Author: Mustan Mirza

  • मनोज जरांगेंच्या तोंडून पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक

    मनोज जरांगेंच्या तोंडून पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनात गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता पहिल्यांदाच त्यांचं उघडपणे कौतुक केलं आहे. धाराशिवमधील एका कार्यक्रमात जरांगे यांनी फडणवीसांना थेट ‘काकाजी’ म्हणून संबोधलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटी येथे पोलिस लाठीमार झाला होता. त्यावेळी गृहमंत्रिपद फडणवीसांकडे असल्याने त्यांच्यावर जबाबदारी…

  • भारतामध्ये नेपाळसारखी परिस्थिती उद्भवू शकते; प्रकाश आंबेडकर

    भारतामध्ये नेपाळसारखी परिस्थिती उद्भवू शकते; प्रकाश आंबेडकर

    पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीवर गंभीर इशारा दिला आहे. नेपाळमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून तरुणांनी सत्ता उलथवून टाकली, तसाच उद्रेक भारतातही होऊ शकतो, असे ते म्हणाले. पुण्यात माध्यमांशी बोलताना आंबेडकरांनी पीएचडी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला समर्थन दर्शवले. विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत असूनही पोलिसांनी त्यांची दखल…

  • मनोज जरांगे पाटलांचा ‘चलो दिल्ली’ नारा; मराठा समाजाचे लवकरच दिल्लीत अधिवेशन

    मनोज जरांगे पाटलांचा ‘चलो दिल्ली’ नारा; मराठा समाजाचे लवकरच दिल्लीत अधिवेशन

    धाराशिव : मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. धाराशिवमध्ये हैद्राबाद गॅझेट संदर्भातील बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. देशभरातील मराठा बांधवांना एकत्र आणण्यासाठी दिल्लीत मोठं अधिवेशन घेण्यात येणार असून लवकरच त्याची तारीख जाहीर होणार आहे. जरांगे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी…

  • मुंबई मेट्रो-३ : अंधेरी ते कफ परेड ‘अक्वा लाईन’मुळे उद्योग, शिक्षण, आरोग्य व धार्मिक स्थळांना मिळणार अखंडित जोडणी

    मुंबई मेट्रो-३ : अंधेरी ते कफ परेड ‘अक्वा लाईन’मुळे उद्योग, शिक्षण, आरोग्य व धार्मिक स्थळांना मिळणार अखंडित जोडणी

    मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला वाहतुकीच्या सोयीसाठी लवकरच मोठी भेट मिळणार आहे. ३३.५ किमी लांबीचा मेट्रो-३ प्रकल्प, ज्याला ‘अक्वा लाईन’ म्हटलं जातं, हा ३० सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. कफ परेड ते आरे अशा २७ स्थानकांमधून धावणाऱ्या या भूमिगत मार्गामुळे मुंबईतील…

  • परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा

    परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा

    मुंबई : ब्राह्मण समाजाच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. अजित पवार गटाचे आशिष दामले हे या महामंडळाचे अध्यक्ष असून मंगळवारी नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय काढला. महामंडळ स्थापन झाल्यानंतर त्याच्या अखत्यारीबाबत सामाजिक न्याय विभाग आणि इतर मागासवर्गीय कल्याण विभाग यांच्यात…

  • छगन भुजबळांना कोर्टाचा धक्का; बेनामी मालमत्ता खटला पुन्हा सुरू होणार

    छगन भुजबळांना कोर्टाचा धक्का; बेनामी मालमत्ता खटला पुन्हा सुरू होणार

    मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधातील बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा उफाळले आहे. विशेष न्यायालयाने सरकारला हा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या काही कंपन्यांविरोधात आयकर विभागाने २०१७ मध्ये…

  • ”मोदी जगातील सर्वात मोठा ब्रँड” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ”मोदी जगातील सर्वात मोठा ब्रँड” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई : ‘‘भारतीय जनता पक्ष हा केवळ कार्यकर्त्यांचा पक्ष नाही, तर कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करणारा पक्ष आहे. आज नरेंद्र मोदी हे नावच जगातील सर्वांत मोठा ब्रँड बनले आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची ताकद अधोरेखित केली. मुंबई भाजपच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय…

  • महाराष्ट्रातील बालकांचे आरोग्य धोक्यात : ३३ लाखांना असंसर्गजन्य आजारांचा फटका

    महाराष्ट्रातील बालकांचे आरोग्य धोक्यात : ३३ लाखांना असंसर्गजन्य आजारांचा फटका

    मुंबई : महाराष्ट्रातील तब्बल ३३ लाख बालकं असंसर्गजन्य आजारांच्या विळख्यात अडकली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मधुमेह, अस्थमा, सिकलसेल, जन्मजात हृदयरोग अशा गंभीर आजारांनी राज्यातील लहान वयोगटातील मुलांवर मोठे आरोग्य संकट ओढवले आहे. युनिसेफ आणि राज्य शासनाने संयुक्तरीत्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे…

  • मोरवणे ग्रामसभेचा ऐतिहासिक ठराव : गावची जमीन गावाबाहेरील लोकांना विकणार नाही”

    मोरवणे ग्रामसभेचा ऐतिहासिक ठराव : गावची जमीन गावाबाहेरील लोकांना विकणार नाही”

    चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामसभेत गावकऱ्यांनी एक ऐतिहासिक ठराव एकमुखाने मंजूर केला. या ठरावानुसार गावातील जमीन गावाबाहेरील किंवा परजिल्ह्यातील लोकांना विकता येणार नाही. एखाद्या कुटुंबाला आर्थिक गरजेपोटी जमीन विकावी लागल्यास ती प्रथम गावातील व्यक्तींनाच विकावी, अशी अट ठेवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत कोकणातील निसर्गरम्य गावांमध्ये बाहेरील लोकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी…

  • श्रीलंकेत न्येलेनी ग्लोबल फोरम: १०२ देशांतील प्रतिनिधींचा सहभाग

    श्रीलंकेत न्येलेनी ग्लोबल फोरम: १०२ देशांतील प्रतिनिधींचा सहभाग

    श्रीलंकेतील कॅंडी शहरात ६ ते १३ सप्टेंबर २०२५ दरम्यान तिसरा न्येलेनी ग्लोबल फोरम संपन्न झाला. या परिषदेत १०२ देशांमधील ७०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, यामध्ये महिला प्रतिनिधींचे प्रमाण तब्बल ६० टक्के होते.शेतकरी संघटनांची आंतरराष्ट्रीय संस्था ला व्हिया कॅम्पेसिना आणि श्रीलंकेच्या एनपीपी सरकारच्या सहकार्याने या फोरमचे आयोजन करण्यात…