Author: Mustan Mirza
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
•
मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मे २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचा आदेश दिला होता.…
-
जहाल माओवादी नेता सहदेव सोरेंसह तिघांचा खातमा
•
गडचिरोली/हजारीबाग : झारखंडमधील हजारिबाग जिल्ह्यात सोमवारी पहाटे झालेल्या मोठ्या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. गोहेरर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंटर्री जंगलात झालेल्या चकमकीत जवानांनी तीन माओवादी दहशतवाद्यांचा खातमा केला. यात केंद्रीय समितीचा जहाल माओवादी नेता सहदेव सोरेन याचा समावेश असून त्याच्यावर आणि इतर दोन्ही माओवाद्यांवर मिळून चार कोटींहून अधिकचे इनाम…
-
कुपोषणाऐवजी स्थूलपणाचं संकट; २०३० पर्यंत जगातील ११% भार भारतावर?
•
युनिसेफच्या चाइल्ड न्यूट्रिशन रिपोर्ट २०२५ नुसार भारतात मुलांमधील कुपोषणाचं चित्र बदलत असून स्थूलपणा हे मोठं संकट म्हणून समोर आलं आहे. यापूर्वी मुलांमध्ये वजन कमी असणं हे कुपोषणाचं प्रमुख लक्षण मानलं जात होतं; पण आता अति खाणं, चुकीचं खाणं आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे स्थूलपणा वेगाने वाढताना दिसतो आहे. अहवालानुसार, २०३० पर्यंत भारत…
-
जमाते इस्लामीचा विजय : जेयु विद्यार्थी निवडणुकांत इस्लामी छात्र शिबिरचे वर्चस्व”
•
ढाका विद्यापीठातील (डीयू) विजयाच्या काही दिवसांनंतर इस्लामी संघटना जामाते-इस्लामीने जाहंगिरनगर विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकांवर झेंडा फडकावला आहे. इस्लामी छात्र शिबिर , जी जामाते-इस्लामीची विद्यार्थी शाखा आहे, हिने शनिवारी झालेल्या केंद्रीय विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांत २५ पैकी तब्बल २० जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे मागील ३५ वर्षांपासून या संघटनेवर कॅम्पस बंदी होती. अलीकडेच…
-
महाराष्ट्रात मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासाला गती; मुख्यमंत्र्यांचा संकल्प
•
महाराष्ट्रात मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रात प्रचंड विकासाची क्षमता असून त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य सरकार सर्वंकष योजना आखणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वर्षा निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील मत्स्यव्यवसायाच्या प्रगतीसाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय…
-
नक्षलवादाच्या छायेतून शिक्षणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल, ७२ वाचनालये उभारले
•
गडचिरोली जिल्हा एकेकाळी नक्षलवादामुळे ओळखला जात होता. पोलिसांचे अस्तित्वच नसलेल्या या भागात आज शिक्षणाची क्रांती होत आहे. पोलिस प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने जिल्ह्यात तब्बल ७२ वाचनालये उभारून नवा इतिहास रचला आहे. या वाचनालयांमुळे जिल्ह्यातील तरुणाईला अभ्यासासाठी सुरक्षित व सकारात्मक वातावरण मिळाले आहे. स्पर्धा परीक्षा, नैतिक मूल्ये व संस्कार यांसंबंधी हजारो पुस्तके…
-
“राज”शाही स्पर्श लाभलेला शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा खुला होणार !
•
मुंबई : दीड वर्षांच्या ब्रेकनंतर शिवाजी पार्क जिमखाना अखेर पुन्हा एकदा सदस्यांसाठी नव्या रूपात खुला होत आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून, म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी, जिमखाना सदस्यांसाठी “भारतरत्न” सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते खुला होणार आहे. मधल्या काळात जिमखान्याच्या पुनर्निर्माण आणि आधुनिकीकरणासाठी तो बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…
-
नैसर्गिक शेतीचे अग्रदूत आचार्य देवव्रत यांचे स्वागत असो!
•
भारतीय समाजाला निसर्गाशी पुन्हा जोडणारे प्रेरणास्थान म्हणून ओळख असणाऱ्या राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे स्वागत करणारा विशेष लेख आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळणे, ही केवळ एक औपचारिक बातमी नाही, तर राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर नव्या दृष्टीकोनाची सुरुवात असू शकते. आचार्य देवव्रत हे केवळ राज्यपाल किंवा प्रशासकीय पदावर…
-
तेजस घाडगे यांना राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार
•
वडोदरा येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय चेंजमेकर परिषदेत प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या पालवी प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय भागीदारी व स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स प्रमुख तेजस डिंपल घाडगे यांना राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. देशभरातील २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून निवडलेल्या ५१ समाजपरिवर्तकांपैकी घाडगे हे एकमेव पुरस्कार विजेते ठरले. हा सोहळा समन्वय प्रतिष्ठान, वडोदरा…