Author: Mustan Mirza

  • एमसीए निवडणुकीत अजिंक्य नाईक गटाचा दबदबा; जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष

    एमसीए निवडणुकीत अजिंक्य नाईक गटाचा दबदबा; जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष

    मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अजिंक्य नाईक गटाने मोठा विजय मिळवला आहे. उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली असून त्यांनी प्रतिस्पर्धी नवीन शेट्टी यांचा ४८ मतांनी पराभव केला. सचिवपदी उन्मेष खानविलकर यांनी २२७ मतांसह विजय मिळवत शाह आलम शेख यांचा पराभव केला. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले २२८…

  • श्री संत मोतीराम महाराज संस्थानतर्फे १६ नोव्हेंबर रोजी संत पुरस्कार वितरण सोहळा

    श्री संत मोतीराम महाराज संस्थानतर्फे १६ नोव्हेंबर रोजी संत पुरस्कार वितरण सोहळा

    आळंदी— श्री क्षेत्र फळा , ता. पाळम, जि. परभणी येथील श्री संत मोतीराम महाराज संस्थान, शाखा आळंदी यांच्या वतीने आयोजित कार्तिकी वारीनिमित्त “संत पुरस्कार वितरण सोहळा” यावर्षी भव्य उत्साहात पार पडणार आहे. हा सोहळा शनिवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.…

  • एआयच्या वापरावर न्यायालयीन नियंत्रणाची गरज : सरन्यायाधीश बी. आर. गवईंचा इशारा

    एआयच्या वापरावर न्यायालयीन नियंत्रणाची गरज : सरन्यायाधीश बी. आर. गवईंचा इशारा

    नवी दिल्ली – कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या अनियंत्रित वापरामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सोमवारी गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका खोट्या मॉर्फ केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या न्यायालयात जोडा फेकल्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे, परंतु हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले…

  • पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; 165 पैकी 83 जागा महिलांसाठी राखीव

    पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; 165 पैकी 83 जागा महिलांसाठी राखीव

    पुणे – पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून यंदा महिलांसाठी मोठ्या प्रमाणात जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण 165 नगरसेवकांच्या जागांपैकी तब्बल 83 जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत. या आरक्षणामुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन आरक्षण आराखड्यानुसार, पुणे…

  • गडचिरोलीत ₹१४६८ कोटींचं जागतिक दर्जाचं वैद्यकीय संकुल उभारणार

    गडचिरोलीत ₹१४६८ कोटींचं जागतिक दर्जाचं वैद्यकीय संकुल उभारणार

    गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सिरोंचा तालुक्यातील राजेश्वरपल्ली येथे ‘रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि.’ तर्फे जागतिक दर्जाचे शैक्षणिक वैद्यकीय संकुल उभारले जाणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य प्रकल्पावर सुमारे ₹१४६८ कोटींचा खर्च…

  • तुरुंगातील ७० टक्के कैदी अद्याप निर्दोष ठरलेले नाहीत; फेअर ट्रायल प्रोग्रामने उघड केली धक्कादायक वास्तवता

    तुरुंगातील ७० टक्के कैदी अद्याप निर्दोष ठरलेले नाहीत; फेअर ट्रायल प्रोग्रामने उघड केली धक्कादायक वास्तवता

    नवी दिल्ली : देशातील तुरुंग व्यवस्थेतील भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. देशातील तब्बल ७० टक्क्यांपेक्षा जास्त कैदी अद्याप दोषी ठरवण्यात आलेले नाहीत, तरीही वर्षानुवर्षे तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी नालसार विद्यापीठाच्या स्क्वेअर सर्कल क्लिनिकचा अहवाल प्रसिद्ध करताना ही माहिती दिली. या अहवालानुसार, ७४ टक्के कैदी…

  • मुंबईचा श्वास अजूनही कोंडलेलाच; ५७४ कोटी खर्चूनही प्रदूषण नियंत्रणात अपयश

    मुंबईचा श्वास अजूनही कोंडलेलाच; ५७४ कोटी खर्चूनही प्रदूषण नियंत्रणात अपयश

    मुंबई : राज्य सरकारने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असला तरी परिणाम मात्र शून्य असल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई महानगरपालिकेने ९३८.५९ कोटींपैकी तब्बल ५७४.६४ कोटी रुपये खर्च केले, तरीही शहरातील हवेची गुणवत्ता सुधारलेली नाही. वातावरण फाउंडेशन आणि एन्वारोकॅटलिस्ट यांनी संयुक्तपणे सादर…

  • शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची अचानक भेट; पार्थ पवार जमीन प्रकरणावर चर्चा?

    शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची अचानक भेट; पार्थ पवार जमीन प्रकरणावर चर्चा?

    पुण्यातील कथित बहुशे कोटींच्या जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी सकाळी अचानक भेट झाली. ही भेट सुमारे 15 मिनिटे चालली असून, त्यानंतर पवार हे मंत्रालयाजवळील वाय. बी. चव्हाण केंद्रात आपल्या कार्यालयात रवाना झाले. सदर भेटीत मुंबई क्रिकेट असोसिएशन…

  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इनोव्हेशन महाकुंभ 2025’ चे उद्घाटन; महाराष्ट्र ‘स्टार्टअप राजधानी

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इनोव्हेशन महाकुंभ 2025’ चे उद्घाटन; महाराष्ट्र ‘स्टार्टअप राजधानी

    एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इनोव्हेशन महाकुंभ 2025’ या स्टार्टअप कार्यक्रमाचे रविवारी भव्य उद्घाटन करण्यात आले. या वेळी विद्यापीठाच्या प्री-इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले, तसेच वैद्यकीय, कृषी आणि वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातील तीन नवकल्पनांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक…

  • ‘भारतीय काव्यशास्त्रातील गोपन आणि शोधन’ विषयावर विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान

    ‘भारतीय काव्यशास्त्रातील गोपन आणि शोधन’ विषयावर विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान

    मुंबई — प्रख्यात कवी विंदा करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन यंदा “भारतीय काव्यशास्त्रातील गोपन आणि शोधन” या विषयावर करण्यात आले आहे. हा कार्यक्रम हजारिमल सोमनाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय आणि श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालय (स्वायत्त), बांद्रे (पूर्व), मुंबई यांच्या वतीने, विंदा करंदीकर…