Author: Mustan Mirza
-
फटाक्यांवरील निर्बंध केवळ दिल्लीपुरतेच का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
•
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवरील निर्बंध केवळ दिल्ली-एनसीआरपुरते मर्यादित ठेवण्याऐवजी संपूर्ण देशभर लागू करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. शुद्ध हवा मिळणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट करत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरकारसमोर गंभीर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, जर दिल्लीतील नागरिकांना शुद्ध हवा मिळण्याचा हक्क…
-
“भारत मोठा होत चालल्याने टॅरिफ लावले गेले” : मोहन भागवत
•
नागपूर : “भारत मोठा होत चालल्याने काही देश अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या भीतीमुळेच भारतावर टॅरिफ लावले गेले,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. हिंगणघाटच्या जाम येथील विश्वशांती सरस्वतीच्या वार्षिक उत्सवदर्शनात ते बोलत होते. भागवत म्हणाले की, “भारताची प्रगती जगाला दिसते आहे. सातासमुद्रापलीकडील…
-
दिल्ली नंतर मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी, परिसर रिकामा
•
मुंबई : दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयालाही शुक्रवारी दुपारी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर ही धमकी आली असून तात्काळ सर्व न्यायमूर्ती, वकील, कर्मचारी आणि नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. यामुळे सुरू असलेली सर्व सुनावणी थांबवण्यात आली असून न्यायालयीन कामकाज ठप्प झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
-
जीआरवरून वादंग : सरकारचा दावा, ओबीसींवर अन्याय नाही
•
मुंबई : हैदराबाद गॅझेटनंतर राज्य सरकारने काढलेल्या नव्या शासन निर्णयावरून ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा चिघळला आहे. मात्र हा जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नसून, अन्याय टाळण्यासाठी घेतलेला निर्णय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. “या सरकारच्या काळात ओबीसींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही,” असा ठाम विश्वास…
-
समृद्धी महामार्गाच्या कामात निष्काळजीपणा; कंत्राटदारावर गुन्हा दाखल
•
दौलताबादजवळील समृद्धी महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात झालेल्या निष्काळजीपणामुळे अनेक वाहनांचे टायर पंचर झाले. या प्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना अशी की, माळीवाडा गावाजवळील पुलावर पडलेल्या भेगा बुजविण्यासाठी इंजेक्शनने नोजल बसविण्याचे काम मंगळवारी मध्यरात्री सुरू होते. कामादरम्यान वाहतुकीसाठी योग्य अशी सुरक्षा व्यवस्था न करता काम सुरू ठेवण्यात आले.…
-
ईव्हीएम तुटवड्यामुळे छत्रपती संभाजीनगरात कमी होणार मतदान केंद्रे
•
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दिवाळीनंतर नगरपालिकांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मात्र या निवडणुकांमध्ये ईव्हीएम तुटवड्याचे संकट निर्माण होणार असल्याने जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रे कमी केली जाण्याची शक्यता आहे. यंदा १०० हून अधिक केंद्रे कमी होतील, असा अंदाज आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात…
-
मुंबईत मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश
•
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईवर हल्ल्याची तयारी करणाऱ्या आयसीसशी (ISIS) संबंधित दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. आफताब अन्सारी आणि सूफियान अबुबकर खान या दोन दहशतवाद्यांना दिल्ली रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोघे मुंबईला रवाना होण्याच्या तयारीत होते. त्यांच्या ताब्यातून तीन पिस्तुलं, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि आयईडी बनवण्याचे…
-
भारतात तीर्थयात्रा पर्यटनाला मोठी मागणी; मेक माय ट्रिपचा अहवाल
•
कोयंबतूर : भारतात पर्यटन उद्योगामध्ये तीर्थयात्रा पर्यटन हा वेगाने वाढणारा विभाग ठरत असल्याचे मेक माय ट्रिप या प्रवासी संस्थेच्या ‘पिल्ग्रिमेज ट्रॅव्हल ट्रेंड्स 2024-25’ या अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात ५६ प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये झालेल्या नोंदणीवरून १९ टक्क्यांची वाढ नोंदली गेली. यापैकी ३४ स्थळांनी दहापट वाढ दाखवली, तर १५ स्थळांनी…
-
अमेरिकेच्या नव्या कर प्रस्तावामुळे भारतीय आयटी उद्योगाला मोठा धोका
•
भारतीय आयटी उद्योगासाठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेतील खासदार डॅरन अॅल्र्ड यांनी परदेशी कामगार नेमणाऱ्या कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव मांडला असून, याचा थेट फटका भारतीय कंपन्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हॉलीवूड इंटरनॅशनल रिलेशन्स अॅण्ड पब्लिक अफेअर्स कमिटीने या विधेयकाला हिरवा कंदील दिल्याने आता ते काँग्रेसमध्ये…
-
दादर कबुतरखाना : कबुतरांची संख्या घटली, दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला
•
मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना अखेर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. महापालिकेने तातडीने कारवाई करत परिसर सील केला असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे कबुतरांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. गेल्या काही वर्षांपासून कबुतरखान्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर अनेक वेळा तक्रारी होत होत्या.…