Author: Mustan Mirza
-
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून वाद पेटला; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
•
तुळजापूर : श्री तुळजाभवानी पुजारी मंडळावरून पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. मंडळाच्या कार्यप्रणाली व आर्थिक व्यवहारांवर गंभीर आरोप झाले असून, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने आले आहेत. या प्रकरणामुळे तुळजापूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. माजी सभासद किशोर आयाचितकर यांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पुजारी मंडळाच्या कारभारात मोठ्या…
-
व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार; लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस
•
मुंबई : लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातील व्हीआयपी आणि सामान्य भक्तांसाठी ठेवण्यात आलेल्या वेगवेगळ्या दर्शन व्यवस्थेबाबत अन्यायकारक भेदभाव होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने मंडळाला तसेच राज्य प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने…
-
ट्रान्सजेंडर समावेशक लैंगिक शिक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस
•
नवी दिल्ली : शालेय अभ्यासक्रमात ट्रान्सजेंडर समावेशक सर्वांगीण लैंगिक शिक्षण (सीएलई) समाविष्ट करण्याबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) तसेच महाराष्ट्रासह काही राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे. विद्या गर्ग आणि नयन तारा गुहा यांनी दाखल…
-
3 वाजेपर्यंत जागा रिकामी करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू : हायकोर्टाचा अल्टिमेटम
•
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने आंदोलकांचे सुरू असलेले आंदोलन बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत कठोर शब्दांत राज्य सरकारला तंबी दिली. कोर्टाने सांगितले की, आझाद मैदानावर केवळ ५ हजार…
-
दहावीत शिकणाऱ्या मुलीची शाळेसमोरच चाकूने भोसकून हत्या
•
नागपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा असतानाही नागपूरमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची तिच्याच शाळेसमोर चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना अंजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे कॉलनीतील अंजनी शाळेजवळ घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव अँजेल जॉन (कौशल्यनगर, नॅप्र) असे आहे. आरोपी हा अल्पवयीन असून तो पीडितेच्या शाळेचा माजी विद्यार्थी…
-
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमारेषेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
•
नवी दिल्ली : भारतात होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी अमेरिकेसारखी सीमारेषेवर भिंत उभारण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे का, असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला केला. या प्रश्नामुळे पुन्हा एकदा बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. बांगाली, पंजाबी भाषिक सारख्या समाजघटकांचे सांस्कृतिक बंधन सीमापार टिकवणे महत्त्वाचे आहे, मात्र या…
-
जीएसटी सुधारणा : विरोधी पक्षशासित राज्यांकडून भरपाईची मागणी
•
नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) सुधारणांमुळे राज्यांच्या महसुलात मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंदाजे १.५ लाख कोटी ते २ लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असे सांगत विरोधी पक्षांच्या सत्ता असलेल्या आठ राज्यांनी केंद्राकडे महसूल भरपाईची मागणी केली आहे. हिमाचल…
-
मराठा आंदोलनामुळे मुंबई ठप्प; प्रवासी अडचणीत, पोलिसांची दमछाक
•
मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासून वाहतूक कोंडीची तीव्र समस्या निर्माण झाली. आझाद मैदानाच्या दिशेने निघालेल्या आंदोलनकऱ्यांनी पूर्व दुतर्फा महामार्ग, ईस्टर्न फ्रीवे आणि विविध मुख्य रस्त्यांवर वाहनांची गर्दी केली. त्यामुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. शिवडीपासून आझाद मैदानाकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना…
-
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगारनिर्मितीची संधी
•
मुंबई : महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधींना नवा वेग मिळत असून तब्बल ३४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी १७ महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाले आहेत. या करारामुळे राज्यात तब्बल ३३ हजार नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हे करार पार पडले. या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सौर…
-
राज्यात एका वर्षात तब्बल ५१ हजार ८८८ अनाथ-निराधार बालकांची भर
•
महाराष्ट्रात अनाथ व निराधार मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकायदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ एका वर्षात तब्बल ५१ हजार ८८८ मुलांची वाढ झाली असून, सध्या १ लाख ४५ हजार ९३ बालकांचे संगोपन शासनामार्फत केले जात आहे. या मुलांच्या संगोपनासाठी राज्य सरकारतर्फे…