Author: Mustan Mirza
-
मुंबईकरांसाठी येणार २६८८ एसी रेल्वे –प्रवाशांना मोठा दिलासा
•
मुंबई : राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासासंदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत मुंबई व राज्यातील प्रवाशांना दिलासा देणारे पाच मोठे निर्णय जाहीर करण्यात आले असून त्याचा थेट फायदा लाखो प्रवाशांना होणार आहे. उपनगर रेल्वे सेवेत प्रवाशांच्या वाढत्या ताणाचा विचार करता एकूण २६८८ एसी…
-
आईच्या गर्भाशिवाय रोबोटच्या पोटात वाढणार बाळ; चीनचा अजब प्रयोग
•
शांघाय : चीनमधील शास्त्रज्ञांनी असा क्रांतिकारी प्रयोग सुरू केला आहे, ज्यामुळे भविष्यात आईच्या गर्भाशिवाय बाळ जन्माला येऊ शकते. नानजिंग टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील डॉ. झांग यांच्या नेतृत्वाखालील टीमने जगातील पहिला “बाळ वाढवणारा रोबोट” तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या यंत्राच्या सहाय्याने बाळाला पूर्ण नऊ महिने कृत्रिम पिशवीत ठेवून सुरक्षित वाढवले जाऊ…
-
नवी मुंबईत ‘पंतप्रधान एकता मॉल’ची उभारणी; राज्य सरकारकडून समितीची स्थापना
•
मुंबई: देशातील विविध राज्यांचे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबईच्या उलवे येथे ‘पंतप्रधान एकता मॉल’ची उभारणी करण्यात येणार आहे. सिडकोमार्फत हा मॉल बांधला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अनेकांत एकता’ या विचारातून ही संकल्पना पुढे आली असून, प्रत्येक राज्यात असा एक मॉल उभारण्याचे…
-
अतिवृष्टीमुळे ४ लाख हेक्टरवरील पिकांना मोठा फटका: राज्यात २१ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
•
मुंबई: मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे राज्यात जवळपास ४ लाख हेक्टरवरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अतिवृष्टीचा आढावा घेतला असून, २१ ऑगस्टपर्यंत…
-
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी
•
नवी दिल्ली: ‘इंडिया’ आघाडीने सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यावर विचार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत, ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी मतदारांच्या भूमीवरील प्रश्नांवर निवडणूक आयोगाने दिलेली उत्तरे आणि आयोगाच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा केली. निवडणूक आयोगाने पत्रकार…
-
रोजगार संधी! पर्यटन क्षेत्रात तयार होणार ५० लाख नवीन नोकऱ्या
•
मुंबई : येत्या काळात देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या योजनेनुसार, पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रिसॉर्ट्स आणि पर्यटन स्थळांवरील स्थानिक सेवांची मागणी वाढणार आहे. सरकारच्या या धोरणामुळे, पर्यटनाशी संबंधित विविध क्षेत्रांत रोजगार निर्मिती…
-
माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांवर राज्य माहिती आयोगाचा चाप; १० हजार अर्ज फेटाळले
•
मुंबई: माहिती अधिकार कायद्याचा (RTI) गैरवापर करून शेकडो आणि हजारो अर्ज दाखल करणाऱ्या ‘सराईत’ अर्जदारांवर राज्य माहिती आयोगाने आता कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल १० हजार अर्ज/अपील फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे माहिती अधिकाराच्या नावाखाली सरकारी यंत्रणांचा बहुमूल्य वेळ आणि संसाधने वाया घालवणाऱ्यांवर मोठा चाप…
-
ई-वाहनांना ‘समृद्धी’सह तीन महामार्गांवर ‘टोल’मुक्त प्रवासाची शक्यता
•
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील ई-वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासह, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि अटल सेतू यांसारख्या प्रमुख महामार्गांवर ई-वाहनांना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. ई-वाहनांना टोलमधून सूट देण्याबाबत परिवहन विभागाने चाचपणी सुरू केली असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या, समृद्धी महामार्गावर हलक्या मोटार वाहनांसाठी प्रति…
-
महाराष्ट्राला मिळणार नवे राज्यपाल, सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार
•
मुंबई: महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या जागी लवकरच नवीन राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या नंतर उपराष्ट्रपती पदावर जाणारे ते महाराष्ट्राचे दुसरे राज्यपाल ठरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. डॉ. शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना काँग्रेसने त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते आणि…
-
खुर्चीवर बसून गाणे गाणाऱ्या रेणापूरच्या तहसीलदारांचे निलंबन
•
रेणापूर : रेणापूर येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांना खुर्चीवर बसून गाणे गायल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विभागीय आयुक्तांनी तात्काळ निलंबित केले आहे. शासनाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. थोरात यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते एका निरोप समारंभात…