Author: Mustan Mirza

  • ई-वाहनांना ‘समृद्धी’सह तीन महामार्गांवर ‘टोल’मुक्त प्रवासाची शक्यता

    ई-वाहनांना ‘समृद्धी’सह तीन महामार्गांवर ‘टोल’मुक्त प्रवासाची शक्यता

    छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील ई-वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासह, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि अटल सेतू यांसारख्या प्रमुख महामार्गांवर ई-वाहनांना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. ई-वाहनांना टोलमधून सूट देण्याबाबत परिवहन विभागाने चाचपणी सुरू केली असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या, समृद्धी महामार्गावर हलक्या मोटार वाहनांसाठी प्रति…

  • महाराष्ट्राला मिळणार नवे राज्यपाल, सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

    महाराष्ट्राला मिळणार नवे राज्यपाल, सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

    मुंबई: महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या जागी लवकरच नवीन राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या नंतर उपराष्ट्रपती पदावर जाणारे ते महाराष्ट्राचे दुसरे राज्यपाल ठरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. डॉ. शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना काँग्रेसने त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते आणि…

  • खुर्चीवर बसून गाणे गाणाऱ्या रेणापूरच्या तहसीलदारांचे निलंबन

    खुर्चीवर बसून गाणे गाणाऱ्या रेणापूरच्या तहसीलदारांचे निलंबन

    रेणापूर : रेणापूर येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांना खुर्चीवर बसून गाणे गायल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विभागीय आयुक्तांनी तात्काळ निलंबित केले आहे. शासनाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. थोरात यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते एका निरोप समारंभात…

  • राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल; भव्य सोहळ्याचे आयोजन

    राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल; भव्य सोहळ्याचे आयोजन

    मुंबई: मराठा साम्राज्याच्या इतिहासाला उजाळा देणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आज (सोमवार) मुंबईत घडणार आहे. श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर महाराष्ट्रात परत येत आहे. महाराष्ट्र शासनाने लिलावात ही तलवार जिंकून ती पुन्हा आपल्या भूमीवर आणली आहे. लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली असून…

  • ‘वकिलांचा विठ्ठल’

    ‘वकिलांचा विठ्ठल’

    “झाड जाणावे फुले…माणूस जाणावा बोले” अशी एक म्हण आहे. तिचा प्रत्यय मला सुमारे तेरा वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. निमित्त होते, पहिल्या वकील परिषदेचे आणि नामवंत विधिज्ञ विठ्ठल कोंडे देशमुख यांच्या भाषणाचे. या राज्यभरातील वकिलांच्या उपस्थितीने गजबजलेल्या अधिवेशनाचा विषय होता, “भारताच्या लोकशाही सक्षमीकरणाच्या कार्यात वकिलांचे योगदान”. आपल्या प्रास्ताविक भाषणात बार कौन्सिल…

  • एसबीआय बँकेचं व्याजदर घटल्याने गृहकर्जाचा ईएमआय कमी होणार

    एसबीआय बँकेचं व्याजदर घटल्याने गृहकर्जाचा ईएमआय कमी होणार

    नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त एक मोठा दिलासा दिला आहे. बँकेने गृहकर्ज आणि कारसाठी संबंधित कर्जाचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ज्या ग्राहकांनी पूर्वी फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतले आहे, त्यांच्या कर्जाचा हप्ता किंवा कर्जाचा कालावधी कमी होऊ शकतो.…

  • ‘वंदे भारत’ला चार डबे वाढणार; सोलापूर-मुंबई प्रवाशांची वेटिंग चिंता मिटणार!

    ‘वंदे भारत’ला चार डबे वाढणार; सोलापूर-मुंबई प्रवाशांची वेटिंग चिंता मिटणार!

    सोलापूर: सोलापूर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीला चार अतिरिक्त डबे जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे आता ही गाडी १६ ऐवजी २० डब्यांची होणार असून, ३९२ अतिरिक्त प्रवाशांना प्रवासाची संधी मिळणार आहे. हा निर्णय २८ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे. यामुळे…

  • कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा कारखाना उघडकीस; तीन तरुणांना अटक

    कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा कारखाना उघडकीस; तीन तरुणांना अटक

    कोल्हापूर/इचलकरंजी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजी येथील मंगळवार पेठेत सुरू असलेल्या एका बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख २४ हजार ९०० रुपये किमतीच्या बनावट नोटा, तसेच त्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त…

  • पती-पत्नीच्या व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

    पती-पत्नीच्या व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

    मुंबई: एका महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये, समलैंगिक जोडप्याने आयकर कायद्यातील ‘पती-पत्नी’ या शब्दाच्या व्याख्येला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या मते, ‘पती-पत्नी’ या शब्दाचा अर्थ केवळ विषमलिंगी जोडप्यांपुरता मर्यादित ठेवणे हे घटनाविरोधी आहे. या याचिकेद्वारे त्यांनी ‘पती-पत्नी’च्या व्याख्येत समलैंगिक जोडप्यांचाही समावेश करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांनाही कायद्यांतर्गत मिळणारे करविषयक लाभ…

  • एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये लक्षणीय घट; खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ घसरला

    एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये लक्षणीय घट; खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ घसरला

    मुंबई: यंदाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत कट ऑफमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. राज्याच्या सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केलेल्या या यादीनुसार, सरकारी कॉलेजमधील खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ गेल्या वर्षीच्या ६९४ च्या तुलनेत यंदा १०२ गुणांपर्यंत घसरला आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठीचा कट ऑफही ४७९ गुणांपर्यंत…