Author: Mustan Mirza
-
कला क्षेत्रातील दोन ‘ऋषितुल्य’ व्यक्तिमत्त्व पद्मभूषण राजदत्त आणि पद्मश्री कामत यांचा होणार सन्मान
•
मुंबई: चित्रपट आणि चित्रकला क्षेत्रातील दोन प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व, पद्मभूषण श्री. राजदत्त आणि पद्मश्री श्री. वासुदेव कामत, यांच्या सन्मानार्थ संस्कार भारती, कोकण प्रांत यांच्या वतीने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे हा सोहळा पार पडेल.’अभ्यासोनि प्रकटावे’ या…
-
इंटेल करणार २५,००० कर्मचाऱ्यांची कपात; आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी कठोर पाऊल
•
नवी दिल्ली: चिप उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी इंटेल (Intel) या वर्षी सुमारे २५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असून, एकाच क्षेत्रात उप-३ (sub-3) सहभागासाठी संघर्ष करत आहे. कंपनीचा आकार गरजेपेक्षा मोठा झाल्याने ही कर्मचारी कपात अटळ असल्याचे म्हटले जात आहे.…
-
उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेवर ताशेरे
•
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि बेजबाबदारपणामुळे दाखल होणाऱ्या खटल्यांवर मुंबईकरांचे पैसे खर्च होत असल्याने उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सामान्य नागरिकांनी हे मुंडकाप कसे सहन करावे?” असा संतप्त सवाल न्यायालयाने शुक्रवारी एका याचिकेवरील सुनावणीत केला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉक्टर यांच्या खंडपीठाने पालिकेला अनावश्यक खटल्यांवर…
-
मोठी बातमी: ‘लाडकी बहीण’ योजनेत १४,२१८ पुरुषांनी घेतला लाभ
•
मुंबई: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ तब्बल १४,२१८ पुरुषांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या पुरुषांना गेल्या दहा महिन्यांपासून २१.४४ कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणावरून राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.…
-
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चां; नार्वेकर म्हणाले: पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू
•
मुंबई : राज्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “विधानसभाध्यक्ष असो किंवा मंत्री किंवा आमदार असो, शेवटी काम हे जनतेसाठीच करायचे असते. मी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो. त्यामुळे पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. जी माझ्या पक्षाची इच्छा…
-
महाराष्ट्रात पीएम-किसान योजनेचे लाभार्थी चारपट वाढले; शेतकऱ्यांच्या खात्यात ३७,००० कोटी रुपये जमा
•
नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. पहिल्या टप्प्यात २१.८४ लाख लाभार्थी असलेले हे आकडे, १९ व्या हप्त्यापर्यंत ९३.२८ लाखांपर्यंत पोहोचले आहेत, ज्यामुळे लाभाथ्यांमध्ये तब्बल चारपट वाढ दिसून येत आहे. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३७,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा झाली…
-
सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन बंधनकारक, हायकोर्टाचे निर्देश
•
मुंबई: आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर सणांदरम्यान प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) पासून बनवलेल्या सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करावे, असा स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाने या संदर्भात लक्ष वेधले.…
-
महाराष्ट्राची जागतिक स्तरावर प्रशंसा: २०३० पर्यंत १ लाख कोटी डॉलरचे लक्ष्य
•
मुंबई: महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाने जागतिक स्तरावर कौतुकास पात्र ठरले आहे. ‘मार्जिन स्टॅनले’ या नामांकित जागतिक वित्तीय सेवा संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक लाख कोटी डॉलर्स (एक ट्रिलियन डॉलर) पर्यंत पोहोचेल. अर्थव्यवस्थांवरील वाढलेला विश्वास, देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणुकीतील वाढ यामुळे राज्याने आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा…
-
महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेतेपद ४ महिने रिक्त राहणार
•
ठाणे: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेतेपद सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांसाठी रिक्त राहणार आहे. यामागे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सदस्यत्वाची मुदत ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस संपत असणे हे प्रमुख कारण आहे.दुसरीकडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव निश्चित…
-
मुख्यमंत्र्यांनी जेएनयूमध्ये केले प्रतिपादन: मातृभाषेचा अभिमान बाळगावा, अन्य भाषांचाही सन्मान करावा
•
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आयोजित एका कार्यक्रमात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, “भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे आणि भाषेविना ज्ञानाचा खजिना उपलब्ध होऊ शकत नाही. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचाही सन्मान करायला पाहिजे.” जेएनयूमध्ये ‘श्री छत्रपती शिवाजी…