Author: Mustan Mirza
-
मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई; मंत्री शंभुराज देसाईंचा इशारा
•
मुंबईत घरे खरेदी करताना कोणत्याही मराठी माणसाचा हक्क डावलला जाणार नाही. मराठी माणसाला घरे नाकारणाऱ्या बिल्डर्स आणि व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्रावर आणि विशेषतः मुंबईवर सर्वात पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ घोषित
•
मुंबई: शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता महाराष्ट्राचा ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत ही महत्त्वाची घोषणा केली. पीओपी मूर्तींवरील निर्बंध बाजूला, निर्मितीला परवानगी या घोषणेसोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी गणेश मूर्तींवरील निर्बंधांबाबतही विधान केले. पीओपी (प्लॅस्टर…
-
शेतकरी योजनांमधील गैरव्यवहारावर कठोर कारवाई: नांदेडमध्ये निलंबन, जालन्यात फौजदारी कारवाई होणार
•
मुंबई: शेतकरी योजनांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन विशिष्ट कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यात येईल, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केली. नांदेड आणि जालना जिल्ह्यातील कृषी योजनांमधील गैरव्यवहार प्रकरणी कठोर पावले उचलली जात असून, दोषींकडून गैरव्यवहाराची रक्कम वसूल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. नांदेड…
-
मराठवाड्यातील पीक पॅटर्नमध्ये मोठा बदल; सोयाबीनने कापूस आणि ‘हायब्रीड’ ज्वारीची जागा घेतली
•
मराठवाड्यातील शेतकरी आता बदलत्या उत्पादन खर्चाचा आणि शेतमालाच्या दराचा विचार करून पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. कधीकाळी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर दिसणारी ‘हायब्रीड’ ज्वारी आता जवळजवळ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कापसाच्या लागवडीलाही शेतकऱ्यांनी ‘राम राम’ ठोकला असून, सोयाबीन हे मराठवाड्यातील प्रमुख नगदी पीक बनले आहे. सोयाबीनसोबतच मक्याचा पेराही मोठ्या प्रमाणात…
-
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत दिल्लीत शाह-शिंदे यांच्यात खलबत
•
ठाणे: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) यांच्या संभाव्य युती आणि त्याचे आगामी महापालिका निवडणुकीवरील परिणामांबाबत सखोल चर्चा झाल्याचे समजते. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांमध्ये…
-
सिंदूर उड्डाणपूलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
•
मुंबई: मुंबईतील जुना ‘कर्नाक पूल’ आता ‘सिंदूर उड्डाणपूल’ या नव्या नावाने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि सामर्थ्याला वंदन करण्याच्या उद्देशाने हे नामकरण करण्यात आले आहे. नामकरणामागची भूमिका अनेक वर्षांपासून ‘कर्नाक पूल’ हे ब्रिटिश गव्हर्नरच्या नावाने…
-
महाराष्ट्र विधानसभा: ‘विशेष जन सुरक्षा विधेयक’ अखेर मंजूर
•
मुंबई: नक्षलवादी विचारांचा प्रसार आणि नक्षलग्रस्त संघटनांवर कारवाई करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे ‘विशेष जन सुरक्षा विधेयक’ गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत बहुमताने मंजूर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले हे विधेयक आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले की, हा कायदा राज्यातील तरुणांना नक्षलवादी विचारांकडे आकर्षित करणाऱ्या संघटनांवर लगाम घालण्यासाठी…
-
आदिवासींच्या धर्मांतर प्रकरणांची चौकशी आणि कठोर कायदा करणार: महसूलमंत्री बावनकुळे यांचे आश्वासन
•
मुंबई: महाराष्ट्रात आदिवासींच्या धर्मांतर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, तसेच यावर कठोर कायदा आणला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार गोपीचंद पडळकर आणि अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला…
-
छत्रपती संभाजीनगरच्या ‘विद्यादीप’ बालगृहाची मान्यता रद्द; मुख्यमंत्र्यांची घोषणा
•
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील ‘विद्यादीप’ बालगृहात मुलींना अमानवी आणि अघोरी वागणूक दिल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी तीन पोलीस निरीक्षकांची समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणातून अनेक गंभीर बाबी समोर आल्याने, अधीक्षक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत घोषणा केली की,…
-
अंबाजोगाईत मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले, वैद्यकीय निष्काळजीपणाचा संशय
•
अंबाजोगाई, बीड: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केलेले एक नवजात बाळ अंत्यसंस्कारासाठी नेत असताना अचानक रडू लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील होळ येथील एक महिला सोमवारी रात्री प्रसूतीसाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात…