Author: Mustan Mirza
-

आधार हा ओळखीचा, नागरिकत्वाचा पुरावा नाही : सुप्रीम कोर्ट
•
नवी दिल्ली : आधार कार्ड हे भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे कागदपत्र नाही, तर ते फक्त ओळखीचा पुरावा म्हणून मान्य केले जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसएसआर) प्रक्रियेत आधार कार्डाला १२ वे अधिकृत कागदपत्र म्हणून समाविष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले…
-

व्हिजन डॉक्युमेंट 2047 प्रमाणे विकासाची धोरणे तयार करा : मुख्यमंत्री फडणवीस
•
मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने “व्हिजन डॉक्युमेंट 2047” या महत्त्वाकांक्षी आराखड्याला दिशा ठरवली आहे. या आराखड्यानुसार भविष्यातील धोरणे तयार करून विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथिगृह येथे या विषयावर आढावा बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव…
-

भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण? आज निकाल लागणार
•
नवी दिल्ली : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार याचा निर्णय आज (मंगळवार, ९ सप्टेंबर) होणार आहे. विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (राजग) उमेदवार असून, त्यांच्यासमोर विरोधकांकडून वि. सु. रेड्डी हे उमेदवार आहेत. राधाकृष्णन हे माजी खासदार असून, त्यांनी तामिळनाडूमध्ये भाजपचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच झारखंड,…
-

स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही, तर कारवाई होणार – वित्तमंत्री सीतारामन
•
नवी दिल्ली : २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी दरांचा फायदा थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नाही, तर उद्योग, उत्पादक आणि राज्य सरकारांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) दरांमध्ये करण्यात आलेल्या कपातीचा खरा उद्देश नागरिकांना महागाईपासून दिलासा देणे हा…
-

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय,आगामी पंचायत व स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवरून होणार
•
कर्नाटक सरकारने राज्यातील आगामी पंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी (EVM) मतपत्रिकेद्वारे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, निवडणूक आयोगाला त्याबाबत शिफारस करण्याचे ठरले आहे. कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले…
-

धरणे भरली, मराठवाड्याची तहान भागली
•
छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्याला यंदा पावसाने दिलासा दिला आहे. सततच्या पावसामुळे सर्व प्रमुख धरणे भरून वाहू लागली असून पिण्याचे पाणी व सिंचनाचा गंभीर प्रश्न सुटला आहे. पैठण येथील जयकवाडी प्रकल्प तब्बल ८८ टक्के भरल्याने सुमारे ९ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मराठवाड्यातील सर्वात…
-

शनिदेवाच्या पूजेसाठी नवा नियम; पूजाऱ्यांना दक्षिणा बंद
•
सोनई : शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने शनिदेवाच्या पूजेतील पारदर्शकता व शिस्त राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार भाविकांकडून आता थेट पूजाऱ्यांना दक्षिणा दिली जाणार नाही. अभिषेकासाठी भाविकांना थेट देवस्थानाकडे १०० रुपये शुल्क भरावे लागेल. त्यानंतरच सहा अधिकृत पुरोहितांच्या मार्फत अभिषेक होईल. हा नवा नियम ६ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती…
-

बाप्पाच्या मंडपातच पार पडला विवाहसोहळा
•
परभणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजोपयोगी उपक्रमांचे महत्व अधोरेखित करणारा अनोखा प्रयोग परभणीत राबविण्यात आला. परभणीतील श्री वक्रतुंड गणेश मित्र मंडळातर्फे मध्यमवर्गीय कुटुंबातील एका जोडप्याचा विवाह थाटामाटात आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे, हा विवाह मंडपातच मंगलाष्टकांच्या गजरात आणि ढोल-ताशांच्या नादात पार पडला. गणेशभक्तांनी दिलेल्या दानाचा उपयोग फक्त सजावट किंवा सोहळ्यापुरता न…
-

प्रशिक्षित शिक्षकांत महाराष्ट्र आघाडीवर; महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय
•
मुंबई : गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल झाले असून राज्यातील शाळांची संख्या कमी झाली असली तरी शिक्षकांची संख्या तब्बल पाच हजारांनी वाढली आहे. यामुळे एकाच शिक्षकावर अनेक विद्यार्थ्यांचा भार कमी झाला आहे. प्रशिक्षित शिक्षकांच्या संख्येत झालेल्या वाढीचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण ७,४७,५०१ शिक्षक…
-

प्रभाग रचनेसाठी मुंबई महापालिकेकडे ४७० हरकती व सूचना; छाननी प्रक्रिया सुरू
•
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेसंदर्भात मुंबई महापालिकेकडे एकूण ४७० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. मुंबईत २२९ प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार असून, या अनुषंगाने मिळालेल्या सूचनांची व हरकतींची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या माहितीप्रमाणे, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांवेळी ९१० हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या.…
