Author: Mustan Mirza

  • बनावट कागदपत्रांद्वारे २५ वर्षे नोकरी; दोन अधिकारी निलंबित

    बनावट कागदपत्रांद्वारे २५ वर्षे नोकरी; दोन अधिकारी निलंबित

    नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात एका महिलेने तिच्या भावजयीच्या नावावर तब्बल २५ वर्षे अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी विधानसभेत समोर आला. या प्रकरणी तक्रार येऊनही कारवाई न केल्याने स्थानिक बालकल्याण प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी…

  • डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करण्याची ‘शालेय शिक्षण अभ्यास व कृती समिती’ची मागणी

    डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करण्याची ‘शालेय शिक्षण अभ्यास व कृती समिती’ची मागणी

    मुंबई: त्रिभाषा सूत्रासंदर्भात स्थापन करण्यात आलेली डॉ. नरेंद्र जाधव समिती तातडीने रद्द करावी, तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (SCERT) संचालक राहुल रेखावार यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी ‘शालेय शिक्षण अभ्यास व कृती समिती’ने सोमवारी आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. समितीचे निमंत्रक…

  • राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस: मराठवाडा व नागपूर विभागाला अजूनही प्रतीक्षा

    राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस: मराठवाडा व नागपूर विभागाला अजूनही प्रतीक्षा

    राज्यात मान्सूनची समाधानकारक प्रगती झाली असून, ७ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरीच्या ९९% पाऊस आतापर्यंत झाला आहे. विशेषतः कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती या चार विभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या दोन विभागांत अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विदर्भात आषाढसरींचा दिलासा सोमवारी विदर्भात आषाढसरींनी…

  • राज्यात लवकरच ‘मेगा भरती’: आदिवासींसाठीची राखीव पदेही भरणार

    राज्यात लवकरच ‘मेगा भरती’: आदिवासींसाठीची राखीव पदेही भरणार

    मुंबई: राज्य सरकार लवकरच ‘मेगा भरती’ मोहीम राबवणार असून, यात आदिवासी समाजासाठी राखीव असलेली पदेही भरली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही: * १५० दिवसांचा कृती कार्यक्रम: कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध सुधारणे, नियुक्ती प्रक्रिया सुलभ करणे, आणि…

  • माजी सरन्यायधीश चंद्रचूड यांच्या सरकारी निवासस्थानावरून वाद: सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला पत्र

    माजी सरन्यायधीश चंद्रचूड यांच्या सरकारी निवासस्थानावरून वाद: सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला पत्र

    नवी दिल्ली: भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी अद्याप आपले सरकारी निवासस्थान रिकामे केले नसल्याने वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने एक असामान्य पाऊल उचलत केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना तातडीने निवासस्थान खाली करण्याचे निर्देश देण्यास सांगितले आहे. सरकारी निवासस्थान रिकामे…

  • सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आता डिजिटल कोर्स उत्तीर्ण करणे बंधनकारक

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आता डिजिटल कोर्स उत्तीर्ण करणे बंधनकारक

    नवी दिल्ली: केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नती संदर्भात एक महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळवण्यासाठी विशिष्ट डिजिटल कोर्स उत्तीर्ण करणे बंधनकारक असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कामगिरी मूल्यांकन अहवालावर (APAR) आणि त्यांच्या पदोन्नतीवर होणार आहे. काय…

  • माजी विद्यार्थी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गिरगाव येथील शाळेला दिली भेट; मातृभाषेतील शिक्षणाचे केले कौतुक

    माजी विद्यार्थी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गिरगाव येथील शाळेला दिली भेट; मातृभाषेतील शिक्षणाचे केले कौतुक

    मुंबई: भारताचे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी रविवारी मुंबईतील गिरगाव येथील त्यांच्या जुन्या शाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मराठी माध्यमात शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक घट्ट होते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शिक्षणासोबतच संस्कारही रुजतात आणि हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वास…

  • छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा CA फायनलमध्ये देशात अव्वल; मुंबईचा मानव शाह तिसरा

    छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा CA फायनलमध्ये देशात अव्वल; मुंबईचा मानव शाह तिसरा

    छत्रपती संभाजीनगर/मुंबई: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) मे महिन्यात घेतलेल्या CA फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात छत्रपती संभाजीनगरच्या राजन काबराने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर मुंबईचा मानव शाह देशात तिसरा आला आहे. राजनने ६०० पैकी ५१६ गुण मिळवले. कोलकाता येथील निष्ठा बोध्रा ५०३ गुणांसह…

  • कबुतरखान्यांवर पालिकेची कारवाई सुरू: दादरमधील अनधिकृत बांधकाम हटवले, धान्य जप्त

    कबुतरखान्यांवर पालिकेची कारवाई सुरू: दादरमधील अनधिकृत बांधकाम हटवले, धान्य जप्त

    मुंबई: राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबुतरखाने बंद करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्याच दिवशी, शुक्रवारी, दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबुतरखान्यावर ‘जी उत्तर’ विभागाने कारवाई करत तेथील अनधिकृत बांधकाम हटवले आणि कबुतरांना दिले जाणारे धान्य जप्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील कबुतरांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारे…

  • बाबा सिद्दीकींच्या मोबाईल नंबरवर डल्ला मारण्याचा प्रयत्न; वांद्रे पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु

    बाबा सिद्दीकींच्या मोबाईल नंबरवर डल्ला मारण्याचा प्रयत्न; वांद्रे पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु

    मुंबई: दिवंगत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या एका मोबाईल नंबरचा ताबा घेण्याचा एका अज्ञात व्यक्तीने प्रयत्न केला आहे. हा नंबर कुटुंबाच्या रिअल इस्टेट आणि व्यावसायिक कंपन्यांशी जोडलेला असल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. या प्रकरणी बाबा सिद्दीकींच्या कन्या डॉ. अर्शिया सिद्दीकी (३९) यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल…