Author: Mustan Mirza
-

ठाणेवैभव ; अर्धशतकाची यशस्वी वाटचाल
•
मराठी पत्रकारितेतील एक अग्रगण्य नाव, ठाणे जिल्ह्यातील समस्या सोडवणारे हक्काचे व्यासपीठ आणि ध्येयवादी पत्रकारितेचा आदर्श असणारे दैनिक “ठाणेवैभव” आज ५१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. संस्थापक संपादक स्व नरेंद्र बल्लाळ यांच्या ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा वसा मन:पूर्वक जपणाऱ्या समस्त बल्लाळ कुटुंबाला, तसेच ‘ठाणे वैभव’च्या संपादकीय, छपाई, जाहिरात , वितरण विभागातील बंधू –…
-

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मांसाहारावरील विधानावरून वादंग
•
मुंबई : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराबाबत केलेल्या विधानावरून राज्यात नवीन वादंग पेटला आहे. “मी मांस खाते तर माझ्या पांडुरंगाला चालते” या त्यांच्या विधानावरून भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, वारकरी संप्रदायाची थट्टा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुळे यांनी शनिवारी नाशिक दौऱ्यात माध्यमांशी बोलताना मांसाहाराविषयी…
-

मराठवाड्यासाठी हक्काचे पाणी मागणाऱ्या दोन याचिका फेटाळल्या : एमडब्ल्यूआरआरएचा अन्यायकारक निर्णय
•
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी २०१९ मध्ये मराठवाडा जनतापरिषद दरवर्षी करीत असलेल्या दोन वेगवेगळ्या याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) नुकत्याच फेटाळल्या आहेत. हा निर्णय मराठवाड्यासाठी अन्यायकारक असून, याविरुद्ध हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याचे जनतापरिषद अध्यक्ष डॉ. शंकरराव नागरे यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने जनआराखड्यात कमी पावसाच्या प्रदेशासाठी…
-

“४२ लाख नव्या मतदारांमागचं सत्य शोधा”, उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना आवाहन
•
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असल्याचे आरोप होत आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जागरूकतेचे आदेश दिले आहेत. “डोळ्यात तेल घालून मतदार तपासा. गेल्या निवडणुकीत सुमारे ४२ लाख मतदार वाढले. त्यात नेमके कोण घुसखोर आहेत, याचा…
-

तीन निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, सरन्यायाधीश गवईंचा हस्तक्षेप
•
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. बी. पारडिवाला यांनी गेल्या महिन्यात दिलेल्या तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत आले असून, सरन्यायाधीश भूषण गवई यांना यात हस्तक्षेप करावा लागला आहे. या प्रकरणांमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयावर केलेली टीका, भटक्या कुत्र्यांबद्दल काढलेला आदेश आणि हिमाचल प्रदेशातील पर्यावरणीय असंतुलनाचा मुद्दा आहे. १) भटक्या…
-

परिवहन मंत्र्यांच्या मतदारसंघातच एसटी कर्मचाऱ्यांची कुचंबणा
•
मीरा रोड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी बसची मागणी मोठ्या प्रमाणावर झाली. भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांनी दहिसर-जोगेश्वरी परिसरातून एसटी बस आरक्षित केल्या. मात्र, या बसेस उशिरा मिळाल्याने आणि योग्य ठिकाणी सोय न झाल्याने मीरा-भाईंदर पालिकेकडे जागांची मागणी करण्यात आली. पालिकेने जागा दिली असली तरी एसटी अधिकाऱ्यांनी पाहणी न…
-

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर एसआयटीची स्थापना
•
मुंबई : परभणीतील पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात अखेर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिस महासंचालकांना आठ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पथकाची घोषणा केली.या एसआयटीचे अध्यक्ष…
-

रमी खेळाच्या व्हिडिओवरून मंत्री कोकाटे यांची रोहित पवारांना मानहानीची नोटीस
•
मुंबई : विधानपरिषदेत मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कोकाटे यांनी मानहानीची नोटीस बजावली आहे. रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये हा व्हिडिओ शेअर करून सरकार व कृषीमंत्र्यावर टीका केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी, “राज्यात रोज आठ शेतकरी…
-

३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीला ‘ब्रेक’; रिलिव्ह-जॉईनिंग रोखले
•
नांदेड : राज्यातील ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या (एपीआय) पदोन्नतीच्या आदेशाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या अधिकार्यांचा आनंद काही तासांतच मावळला आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवार, दि. २१ ऑगस्ट रोजी पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले होते. या आदेशानुसार एपीआयना पोलिस निरीक्षक म्हणून नवीन ठिकाणी रुजू होण्याची संधी मिळणार होती. मात्र, मॅटमधील एका प्रकरणामुळे…
-

तुमची नोकरी एआय घेणार का? भारतीयांमध्ये सर्वाधिक भीती
•
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) नोकऱ्या जाण्याची शक्यता व्यक्त होत असताना जगभरातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ‘ग्लोबल पब्लिक ओपिनियन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या सर्वेक्षणात सहभागी २१ देशांपैकी भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशियातील नागरिकांना नोकरी जाण्याची सर्वाधिक भीती असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतातील तब्बल ८५ टक्के लोकांना वाटते की एआयमुळे त्यांची नोकरीवर…
