Author: Mustan Mirza
-
बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या: दोन पोलिसांसह एजंटला अटक
•
नालासोपारा: नालासोपारा येथे बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान (६१) यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चौहान यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये, कर्जाच्या वसुलीसाठी दोन पोलीस कर्मचारी मानसिक छळ करत असल्याचे नमूद केले होते. या प्रकरणी आचोळे पोलिसांनी दोन पोलीस हवालदार श्याम शिंदे आणि राजेश महाजन यांच्यासह…
-
महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
•
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी अभूतपूर्व गदारोळ झाला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत तातडीने या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली, मात्र ती फेटाळल्याने संतप्त विरोधी पक्षांनी सभात्याग केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “शेतकऱ्यांना भिकारी संबोधले जात…
-
आमदारांच्या बनावट लेटरहेड आणि AI आवाजाचा वापर करून ३ कोटींचा निधी पळवण्याचा प्रयत्न उघड
•
मुंबई: महाराष्ट्रात आमदारांच्या बनावट लेटरहेड, सह्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केलेल्या आवाजाचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा निधी बळकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या लेटरहेड आणि AI आवाजाचा वापर करून ३ कोटी १० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वळवण्याचा प्रयत्न झाला. अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस…
-
भुमरे यांच्या चालकाची नऊ तास चौकशी: १५० कोटींच्या जमिनीचा वाद चिघळला
•
छत्रपती संभाजीनगर: खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांची आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी तब्बल नऊ तास कसून चौकशी केली. शहरातील कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारावरून ही चौकशी सुरू असून, जावेदला मिळालेल्या कथित बक्षीस स्वरूपातील जमिनीवरून वाद पेटला आहे. याप्रकरणी सालारजंग कट्रबातील वंशज मीर महेमूद अली…
-
बुधवारपासून वाहतूकदारांचा ‘चक्का जाम’ आंदोलन: ३० हून अधिक संघटनांचा सहभाग
•
पिंपरी (जि. पुणे) : ‘ई-चालान’ प्रणाली विरोधात राज्यातील माल आणि प्रवासी वाहतूकदारांनी बुधवारी मध्यरात्रीपासून बेमुदत ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारले आहे. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्सच्या अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आंदोलनात राज्यातील ३० पेक्षा जास्त वाहतूक व्यावसायिक संघटना सहभागी झाल्या आहेत.असोसिएशनचे कार्याध्यक्ष गौरव कदम यांनी सांगितले की,…
-
धनंजय मुंडेंच्या आरोपांवर संदीप क्षीरसागरांचा पलटवार: “मी त्यांच्यासारखा १५० दिवस पळून गेलो नाही!”
•
बीड: बीडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना संदीप क्षीरसागर यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरोपी विजय पवार हा क्षीरसागर यांचा निकटवर्तीय…
-
नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन, विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार
•
मुंबई: कालपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याचं दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांचे कामकाज सुरू होताच, पहिल्या तासातच त्यांना दिवसभरासाठी निलंबित केले आहे. सभागृहाच्या अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत म्हणजेच ‘वेल’मध्ये (well of the house) जाऊन…
-
ठाकरी भाषा; घोर निराशा
•
काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे संपलेला पक्ष असल्याचे म्हटले होते. आपला नेताच असे बोलतो म्हंटल्यावर उद्धव सेनेतील अन्य नेतेही मनसे विरोधात बोलू लागले. मग तेव्हापासून मनसेकडून शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नव्हती. हिंदी सिनेमात येते, तसे अचानक एक भाषिक वळण येते… हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर, दोन्ही ठाकरेंना…
-
एकनाथ शिंदे यांचा आमदारांना कानमंत्र: ‘कमी बोला, जास्त काम करा!’
•
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘कमी बोला, जास्त काम करा’ असा कानमंत्र देत, त्यांनी पक्षाची प्रतिमा सुधारण्यावर आणि जनसामान्यांमध्ये पक्षाचे स्थान अधिक मजबूत करण्यावर भर दिला. यावेळी शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले, तसेच निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देशही दिले.…
-
पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून जालन्यात ख्रिश्चन समाज आक्रमक, नेमका वाद काय?
•
जालना : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज जालना शहरात उमटले. सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी पडळकर यांचे आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जालना…