Author: mahacentreweb@gmail.com
-

खरीप पिकांवर एमएसपी निश्चित, व्याज अनुदान योजना जाहीर; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे ५ प्रमुख निर्णय
•
नवी दिल्ली : आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत, खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत २,०७,००० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कर्ज देण्यासाठी व्याज सवलत योजना देखील मंजूर…
-

देशात कोरोना रुग्णाची संख्या वाढली; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
•
मुंबई : भारतात कोरोना या महाभयंकर रोगाने पुन्हा तोंड वर काढले आहे. दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढत्या क्रमात पाहायला मिळत आहे. देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200 वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता वाढली असून प्रशासन सतर्क झालं आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 325 रुग्ण आहेत.…
-

मुंबईत वाहनांची संख्या बीजिंग, शांघाय आणि टोकियो या शहरांपेक्षा जास्त
•
मुंबई : एका अहवालांनुसार, मुंबईत वाहनांची संख्या बीजिंग, शांघाय आणि टोकियो सारख्या इतर मोठ्या शहरांपेक्षा जास्त आहे. एका अहवालानुसार, मुंबईत प्रति चौरस किलोमीटर ८,५०८ वाहने आहेत, तर बीजिंगमध्ये ३८९, शांघायमध्ये ८४९ आणि टोकियोमध्ये १,८०० वाहने आहेत.या आकडेवारीवरून असे दिसून येते की लोकसंख्येच्या बाबतीत मुंबईत वाहनांची संख्या जगातील या मोठ्या शहरांपेक्षा…
-

सावरकरांच्या देशभक्तीपर गीताला छ. संभाजी महाराज राज्य प्रेरणा पुरस्कार प्रदान
•
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘अनादी मी, अनंत मी’ या देशभक्तीपर गीताला पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान केला. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनच्यावतीने सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत…
-

सामनातून अमित शहांवर जोरदार टीका; देशातील सर्वात कमकुवत गृहमंत्री म्हणून उल्लेख
•
मुंबई : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युबीटीमधील राजकीय संघर्ष कमी होण्याचं नाव घेत नाहीये. कारण आता शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामना या मुखपत्राने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात बाळासाहेबांवरील विधानावरून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सामनाने आपल्या संपादकीयत म्हटले आहे की, “अमित शाह यांनी गोंधळून जाऊ नये. जर…
-

स्व. सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार: मुख्यमंत्री फडणवीस
•
मुंबई: स्वतंत्रवीर सावरकरांची बॅरिस्टर पदवी जी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रोखून धरली होती ती पुनर्संचयित करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबई विद्यापीठातील आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान मुंबईत होते, जिथे त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘अनादी मी, अनंत मी’ या…
-

भाजप प्रदेशाध्यक्षपदी लवकरच रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार
•
मुंबई : भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची लवकरच प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. जून महिन्यात त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते, अशी माहिती मिळतेय. नांदेड येथे गृहमंत्री अमित शाह यांनी रवींद्र चव्हाण यांचा उल्लेख भावी प्रदेशाध्यक्ष असा केला होता आणि आता बावनकुळे यांनी…
-

धक्कादायक घटना : एकाच कुटुंबातील सात जणांनी विष प्राशन करून केली आत्महत्या
•
हरियाणाच्या पंचकुला येथे सोमवारी रात्री सेक्टर-२७ मध्ये एक धक्कादायक घटना घडली. कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या एकाच कुटुंबातील सात जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात आणि पोलिस विभागात खळबळ उडाली. यापैकी सहा जणांचा मृत्यू सेक्टर-२६ मधील ओजस रुग्णालयात झाला, तर एकाचा मृत्यू सेक्टर-६ मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला. मृतांची…
-

पुण्यात शनिवारी ”वीरशैव लिंगायत दीपस्तंभ स्मृती गौरव” पुरस्कार सोहळा
•
पुणे : लिंगायत संघर्ष समिती आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्यावतीने शनिवारी 31 मे रोजी सकाळी 10.30 वाजता पुण्यातील महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात वीरशैव लिंगायत दीपस्तंभ स्मृती गौरव पुरस्कार सोहळा आणि स्मरणिका प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करत असलेल्या समाज भूषण व्यक्तींचा “वीरशैव लिंगायत दीपस्तंभ स्मृती गौरव…
-

नांदेडच्या हदगावात अतिवृष्टी; नाल्यात वाहून तिघींचा मृत्यू
•
नांदेड : जिल्ह्यात हदगावात नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून माय-लेकीसह पुतणीचा दुर्देवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वरवट गावात ही घटना घडली आहे. ज्यामध्ये सात आणि दहा वर्षीय लहान मुलींचा समावेश आहे. तिघींचे मृतदेह घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सापडले आहेत. अरुणा बळवंत शकर्गे (वय ३५), दुर्गा बळवंत…
