जागतिक हिवताप दिनानिमित्त ठाण्यात जनजागृती अभियान; या आजारापासून अशी घ्या काळजी

ठाणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त हिवताप या कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती पोहोचवणे आणि जनतेचा सक्रिय सहभाग मिळवणे हे उद्दिष्ट असल्याचं संबंधित विभागाकडून कळतंय. या उपक्रमास जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवले जात आहेत.

हिवतापाची प्रमुख लक्षणे

• थंडी वाजून ताप येणे
• ताप उतरताना घाम येणे
• डोकेदुखी
• मळमळ
• उलटी होणे

प्रतिबंधात्मक उपाययोजना
• १०० दिवस कृती कार्यक्रमअंतर्गत प्रत्येक घरात आठवड्याने / पंधरवड्याने गृहभेटी
• ताप रुग्णांचे नियमित सर्वेक्षण
• हिवताप बाधित रुग्ण आढळल्यास सहवासीतांचे रक्त नमुने व उपचार
• मजूर वर्गावर लक्ष केंद्रित करून जलद ताप रुग्ण सर्वेक्षण
• डबके व नाल्यामध्ये गप्पी मासे सोडणे व टेमिफॉस चा अळी नाशक म्हणून वापर
• ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा साठा व वैद्यकीय पथक कार्यरत
• आरोग्य कर्मचारी यांना कीटकशास्त्रीय प्रशिक्षण देणे

जागतिक दिन विशेष उपक्रम
• शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा
• उत्कृष्ट आशा स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

जिल्हास्तरीय सहभाग
ठाणे जिल्ह्यातील ५ तालुके, ६ महानगरपालिका व २ नगरपालिकांमध्ये जागतिक हिवताप दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. हिवताप हा डासांमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे घरात व आजूबाजूच्या परिसरात डासांची पैदास होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात. हिवतापाची लक्षणे दिसल्यास तात्काळ नजीकच्या शासकीय दवाखान्यात तपासणी करून उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
000

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *