कोणत्या देशाला कितवे स्थान?
मुंबई: भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. एका वर्षात तब्बल ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि चीननंतर भारतात १८५ अब्जाधीशांची संख्या झाली आहे. अब्जाधीशांच्या संख्येत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
एकीकडे भारतात रोजगाराचे संकट आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने कमकुवत होत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.
१० वर्षे, भारतीय- अब्जाधीशांची संख्या दुपटीहून १८५ वर पोहोचली आहे, त्यांची एकत्रित संपत्ती एप्रिल २०२४ च्या अखेरीस तिपटीने वाढली आहे (२६३% वाढली आहे). कौटुंबिक-नेतृत्वातील व्यवसाय भारतामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. हे सार्वजनिकरित्या सूचीबद्ध केलेल्या कुटुंबांच्या सर्वाधिक संख्येपैकी एक आहे
जगातील अब्जाधिशांची संख्येत झपाट्यानं वाढ
दिवसेंदिवस जगात अनेकांच्या संपत्तीत मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळं जगातील अब्जाधिशांची संख्या देखील झपाट्यानं वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. जगाता अमेरिकेत सर्वात जास्त अब्जाधिश आहेत. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. त्यानंतर भारताचा तिसरा क्रमांक लागत आहे. म्हणजे भारतात देखील अब्जाधिश लोकांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, अहवालात दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काळात अब्जाधिशांच्या संख्येत आणथी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
Leave a Reply