काँग्रेसला मोठा धक्का, कार्याध्यक्ष कुणाल पाटील उद्या भाजपमध्ये

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मिळालेल्या यशानंतरही विधानसभा निवडणुकीत महायुतीचं (Mahayuti) जोरदार पुनरागमन झालं. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. महायुतीने २३२ जागा जिंकत सत्ता राखली, तर महाविकास आघाडीला अवघ्या ५० जागांवर समाधान मानावं लागलं. या मोठ्या पराभवानंतर आता महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. अनेक नेते महायुतीत प्रवेश करत असल्याने आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

या पक्षांतराचा सर्वाधिक फटका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena – Uddhav Balasaheb Thackeray) गटाला बसला आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) (NCP – Sharadchandra Pawar) आणि काँग्रेस (Congress) पक्षातील नेतेही भाजप (BJP) आणि शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena – Shinde Faction) पक्षात प्रवेश करत आहेत.
पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील उद्या (मंगळवार, १ जुलै, २०२५) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धुळे जिल्ह्याच्या राजकारणात कुणाल पाटील यांचं मोठं प्रस्थ आहे आणि त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

या पक्षप्रवेशासाठी धुळे तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आजच मुंबईकडे रवाना झाले आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, बाजार समितीचे सभापती आणि संचालक यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद धुळ्यात आणखी वाढणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *