भारतीय शेअर बाजारमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदाराना 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान सहन करावा लागला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स जवळजवळ 1,000 अंकांनी घसरून 78,800 च्या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी सुमारे 335 अंकांनी घसरून 23,908 च्या पातळीवर पोहोचला. सर्वात जास्त घसरण बँकिंग शेअर्समध्ये दिसून आली आहे. स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सची स्थिती आणखी वाईट होती. निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 3 टक्क्यांनी घसरला. निफ्टी मिडकॅप 100 निर्देरांक 2.5 टक्क्यांनी घसरला. सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकही लाल रंगात व्यवहार करत होते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शेअर बाजार सध्या ‘वेट अँड वॉच च्या स्थितीत आहे. येत्या काळात, बाजारातील हालचाली निश्चित करण्यात अनेक मोठे घटक महत्त्वाची भूमिका बजावतील. यामध्ये कंपन्यांचे मार्च तिमाहीचे निकाल, अमेरिकन फेडरल रिझर्दह बँकेची बैठक, भारत-पाकिस्तान तणावातील भविष्यातील परिस्थिती आणि जागतिक भू- राजकीय घटनांचा समावेश आहे. त्यामुळे गंतवणूकदार सावध राहून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. भारतीय शेअर बाजार सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात याबाबत चिंतेत आहे. बहुतेक गुंतवणूकदार घाबरले आहेत. यामुळे ते कोणताही व्यापार करण्यापूर्वी सावधगिरी बाळगत आहेत. या घटनेनंतर सुरुवातीला बाजाराने संतुलित प्रतिक्रिया दिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे,परंतु दोन्ही देशांमधील तणावात मोठी वाढ झाल्यास बाजाराच्या भावनांवर परिणाम होऊ शकतो.
मार्च तिमाहीचे निकाल सुरू झाले आहेत आणि अनेक कंपन्यांचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत आहेत. यामुळे या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.याशिवाय, परदेशी गुंतवणूकदारांनीही त्यांची रणनीती बदलली आहे आणि ते आता अंशतः पैसे काढून घेत आहेत, ज्यामुळे बाजारावर दबाव आला आहे. अलिकडेच शेअर बाजारात सलग 7 दिवस वाढ दिसून आली एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान सेन्सेक्स सुमारे 6,200 अंकांनी म्हणजेच 8.5 टक्क्यांनी वाढला होता. या काळात निफ्टीमध्येही 1,900 अंकांची वाढ झाली. अका परिस्थितीत अनेक गुंतवणूकदार आता या पातळीवर प्रॉंफिट बुक करताना दिसत आहेत. हे आजच्या शेअर बाजारातील घसरणीचे एक प्रमुख कारण आहे.
Leave a Reply