क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचं पाऊल!
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी पाटणा येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात मशाल पेटवून ‘बिहार क्रीडा प्रतिभा शोध स्पर्धा’ या क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या स्पर्धेचा शुभारंभ केला.
या स्पर्धेत बिहारच्या ४० हजार सरकारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील सुमारे ६० लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण १० कोटी रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील खेळांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
बिहारने अलीकडेच महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते, आणि भारताने गेल्या महिन्यात राजगीर येथे विजेतेपदाचे यशस्वीपणे रक्षण केले होते. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील क्रीडा परिसंस्थेचे संवर्धन करणे आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणे आहे.
२०३२ आणि २०३६ ऑलिंपिक स्पर्धेसाठी संभाव्य पदकांची शक्यता निर्माण करणे हे या स्पर्धेचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. या स्पर्धेत सहभागी होणारी मुले तालूका, जिल्हा आणि राज्य स्तरावर आपली क्रीडा क्षमता प्रदर्शित करणार आहेत.
तालुका स्तरावरील विजेत्यांना १०००, ६०० आणि ४०० रुपयांची रोख रक्कम दिली जाईल. जिल्हास्तरीय विजेत्यांना २५००, १५०० रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल, तर राज्य स्तरावरील विजेत्यांना ५०००, ३००० आणि २००० रुपयांची रक्कम मिळेल.
या स्पर्धेत ॲथलेटिक्स, कबड्डी, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल हे प्रमुख खेळ असतील, आणि विजेत्यांना प्रोत्साहन म्हणून स्पोर्ट्स किट आणि प्रमाणपत्रे दिली जातील.
Leave a Reply