भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ‘तवा फॉर्म्युला’ तयार: प्रत्येक आमदाराला पाच कामांचे प्राधान्य

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातून पाच प्रमुख कामे सुचवावीत, अशी सूचना पक्षाकडून करण्यात आली आहे. ही कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे. उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवडाभरात राज्यभरातील भाजप आमदारांसोबत स्वतंत्र बैठका घेऊन ही रणनीती आखली आहे. या बैठकांमध्ये महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपची काय रणनीती असावी, यावर आमदारांची मते जाणून घेण्यात आली. आमदारांकडून सुचवण्यात आलेली कामे आता मार्गी लावली जाणार आहेत.आ

मदारांना सूचना: ‘व्यापक सार्वजनिक हिताची’ कामे सुचवा

आमदारांना अशी कामे सुचवण्यास सांगण्यात आले आहे, ज्यात व्यापक सार्वजनिक हित आहे, जी काही वर्षांपासून रखडली आहेत आणि ज्यामुळे लोकांच्या मोठ्या समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच, अशी कामे जी त्वरित पूर्ण झाल्याने सरकारबद्दल लोकांमध्ये चांगला संदेश जाईल. मतदारसंघात सरकारबद्दल एक सकारात्मक भावना निर्माण होईल, अशीच कामे भविष्यातही सुचवण्याचे आवाहन आमदारांना करण्यात आले आहे.

मुंबईत शिंदे गट आणि अजित पवार गटासोबतच लढणार

मुंबईतील आमदारांच्या रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत, फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुंबईसह राज्यात महायुती म्हणून निवडणूक लढायची आहे. मुंबईत शिंदेसेना आणि अजित पवार गट हेच भाजपचे मित्र असतील आणि मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल, असा निर्धार करायचा आहे.

जास्त बोलू नका’ – माध्यमांशी बोलण्याबाबत आमदारांना ताकीद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना माध्यमांशी जास्त बोलू नका अशी ताकीद दिल्याचे सूत्रांनी सांगितले. माध्यमांशी बोलण्याची जबाबदारी ज्यांना दिली आहे, तेच बोलतील, असे सांगत आमदारांना मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला. जास्त बोलल्याने उगाच वाद ओढावतात, असेही ते म्हणाले.

ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निवडणुकीत एकत्र आल्यास काय होऊ शकते, यावरही बैठकीत आमदारांची मते जाणून घेण्यात आली. काही प्रमाणात नक्कीच फरक पडेल, पण मतांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होईल, त्यामुळे दोघांच्या युतीने त्यांचीच सत्ता येईल, असे अजिबात नाही, असा आमदारांचा सूर होता.
मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना सकारात्मक प्रतिसाद
आमदारांनी विविध बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांना आठवडा-पंधरा दिवसांतून एकदा काही तास फक्त आमदारांसाठी द्यावे आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी केली होती. फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *