प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनी बुधवारी उत्तर प्रदेशातील पिप्रावा येथे 1890 च्या दशकात सापडलेल्या मौल्यवान रत्नांचा लिलाव करणार आहे. ज्यामध्ये बुद्धधातूंचा समावेश आहे. मात्र, आता पिप्रावा रत्नांच्या विक्रीमुळे नवा वादंग निर्माण झाला असून जागतिक स्तरावरील बौद्ध धर्माशी संबंधित नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.गौतम बुद्धांशी संबंधित रत्नांच्या विक्रीवर बौद्ध विद्वानांनी आणि नेत्यांनी तीव्र टीका केली आहे. या अवशेषांना- बुद्धधातूना व्यापाराच्या वस्तू म्हणून वागवू नये असे त्यांनी म्हटले आहे.
द गार्डियनशी बोलताना कंबोडियातील महानिकाय बौद्ध परंपरेचे मुख्यालय वाट उन्नालोमचे प्रमुख डॉ. योन सेंग येथ म्हणाले, “हा लिलाव जागतिक आध्यात्मिक परंपरेचा अपमान आहे.” लंडनमधील SOAS विद्यापीठाच्या ऑश्ले थॉम्पसन आणि क्यरेटर कोनान चेओंग यांनी बीबीसीला सांगितले की, “ही विक्री अनेक नैतिक प्रश्न उभे करते. मानवी अवशेष विकले जाऊ का? आणि कोण ठरवणार की एखादी वस्तू मानवी अवशेष आहे की नाही?. अनेक बौद्ध साधकांच्या दृष्टीने विक्रीस ठेवलेली रत्नं ही हाड आणि राख (बुद्धधातू) यांचा अविभाज्य भाग आहेत.” त्यांनी पुढे सांगितले, “सदबीजचा हा लिलाव अत्यंत पवित्र वस्तुंना विक्रीयोग्य वस्तूमध्ये परिवर्तीत करतो. स्तूपातून ही वस्तू काढण्यात आली आणि त्यांना ‘रत्न” किंवा ‘युरोपियनांच्या आस्वादासाठीच्या वस्तू असे संबोधण्यात आले, एकूणच हा वसाहतीकालीन अन्यायाचे सातत्य असलेला वारसा आहे,” असे ते म्हणतात.
१८९८ साली ब्रिटिश अभियंता विल्यम क्लॅक्सटन पेप्पे यांनी पिप्रावा येथे बुद्ध विहारातील स्तूपाचे उत्खनन केले. पिप्रावा हे लुंबिनीच्या दक्षिणेस आहे आणि गौतम बुद्धांचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार या स्तूपात सापडलेल्या अवशोषांमध्ये गौतम बुद्धाच्या दहनानंतरचे शरीरधातू आणि काही रत्नं सापडली होती. पेप्पे यांनी ही रत्न, बुद्धधातू (अस्थी) आणि त्यांचे पात्र (अस्थी करंडक) ब्रिटिज्ञ भारतातील वसाहती सरकारकडे सुपूर्त केले. ब्रिटिश सरकारने १८७८ च्या इंडियन ट्रेझर ट्रोव्ह कायद्याअंतर्गत या जोधावर अधिकार प्रस्थापित केला. नंतर अस्थी करंडकातील अवशेष (बुद्धधातू) थायलंड, श्रीलंका आणि म्यानमार यांसारख्या बौद्ध देशांना दिले, बुद्धातंच काही अवशेष आणि राख सायमचे राजे चुलालोंगकोर्न यांना भेट म्हणून दिले.
एकूण, सुमारे १८०० रत्नं, पाच अवशेष पात्रे आणि एक दगडी पेटी कोलकात्याच्या इंडियन म्युझियम (पूर्वीचे इम्पीरियल म्युझियम ऑफ कलकत्ता) येथे पाठवण्यात आली. पेप यांनी शोधलेल्या वस्तूपैकी काही भाग त्यांना स्वतःजवळ ठेवण्याची परवानगी देण्यात आली.
Leave a Reply