Category: Blog
-
जिन्हें नाज़ है ‘हिन्दू’ पर वो कहां हैं?
•
साहिर लुधियानवी यांच्या “जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहां हैं” या आर्त गीतातील दुःख आजवर अनेकदा जाणवले होते, पण आज तशाच एका मन उदास करणाऱ्या घटनेने माझे हृदय शतश: विदीर्ण झाले आहे. ती घटना साधीसुधी नाही, ती दुःखद बातमी आहे, निडर, निष्पक्ष पत्रकारितेच्या ढासळत्या दीपस्तंभाची. आजचा दैनिक “द हिन्दू”चा…
-
उदे गं अंबे, उदे !!
•
नवरसाने नटलेल्या नित्यनूतन नवलाईचा, नवसृजनाचा, नवरात्रींचा उत्सव सुरू झाला आहे. आता हवेमध्ये धुपाचा गंध भिनत जाईल. घटस्थापनेनंतर हिरवा निसर्ग, लाल, केशरी, पिवळा होत, अवघ्या भूतलावर, फुलांच्या माळा गुंफत येईल आणि स्त्रीत्वाच्या परमोच्च आविष्काराचे, मातृत्वाच्या गौरवाचे शब्द-गीत चराचरात भिनत जातील… भक्ती आणि शक्तीच्या अविरत प्रवाहात अवघे भारतवर्ष न्हाऊन निघेल… आपले सारे…
-
नैसर्गिक शेतीचे अग्रदूत आचार्य देवव्रत यांचे स्वागत असो!
•
भारतीय समाजाला निसर्गाशी पुन्हा जोडणारे प्रेरणास्थान म्हणून ओळख असणाऱ्या राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे स्वागत करणारा विशेष लेख आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार मिळणे, ही केवळ एक औपचारिक बातमी नाही, तर राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर नव्या दृष्टीकोनाची सुरुवात असू शकते. आचार्य देवव्रत हे केवळ राज्यपाल किंवा प्रशासकीय पदावर…
-
“पार्सियाना”, एक प्रसिद्ध पारशी मासिक ६० वर्षांनंतर बंद होणार
•
मुंबईच्या फोर्ट भागातील एका जुन्या निओ-गॉथिक इमारतीत, जी आता जीर्ण झाली आहे, तिथे चालतं देशातील सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या पारशी मासिकांपैकी एक – “पार्सियाना”. माझ्या आणि सुमेधाच्या “इंडियन एक्सप्रेस”मधील ज्येष्ठ सहकारी मिसेस वकील यांच्यामुळे आम्हाला “पार्सियाना” ची खरी ओळख झाली होती. शिवाय या मासिकाचे संपादक जहांगिर पटेल हे सुमेधाचे सेंट…
-
ठाणेवैभव ; अर्धशतकाची यशस्वी वाटचाल
•
मराठी पत्रकारितेतील एक अग्रगण्य नाव, ठाणे जिल्ह्यातील समस्या सोडवणारे हक्काचे व्यासपीठ आणि ध्येयवादी पत्रकारितेचा आदर्श असणारे दैनिक “ठाणेवैभव” आज ५१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. संस्थापक संपादक स्व नरेंद्र बल्लाळ यांच्या ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा वसा मन:पूर्वक जपणाऱ्या समस्त बल्लाळ कुटुंबाला, तसेच ‘ठाणे वैभव’च्या संपादकीय, छपाई, जाहिरात , वितरण विभागातील बंधू –…
-
पिठोरी_अमावस्या…मातृदिन
•
“पिठोरीचा सण’ म्हणजे मातृत्वाचा आनंद सोहळा ! एक आई आपल्या बाळाच्या जन्मासाठी, त्याच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी प्रार्थना करते; म्हणूनच आजचा हा दिवस आपल्या महाराष्ट्रात तरी *”मराठी मातृ दिन” म्हणुन साजरा केला जातो…. आईच्या अनंत उपकारांचे मनःपूर्वक स्मरण करण्याचा हा सोनेरी दिवस… म्हणून माझ्या आईविपयीचा, सौ. रजनी बळीराम म्हात्रे,…
-
‘वकिलांचा विठ्ठल’
•
“झाड जाणावे फुले…माणूस जाणावा बोले” अशी एक म्हण आहे. तिचा प्रत्यय मला सुमारे तेरा वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. निमित्त होते, पहिल्या वकील परिषदेचे आणि नामवंत विधिज्ञ विठ्ठल कोंडे देशमुख यांच्या भाषणाचे. या राज्यभरातील वकिलांच्या उपस्थितीने गजबजलेल्या अधिवेशनाचा विषय होता, “भारताच्या लोकशाही सक्षमीकरणाच्या कार्यात वकिलांचे योगदान”. आपल्या प्रास्ताविक भाषणात बार कौन्सिल…
-
आजचा दिवस… मोठा भाग्याचा! – महेश म्हात्रे
•
आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्य दिन, एकत्र. गेल्या अनेक वर्षात असा योग आला नव्हता… ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण…. अगदी बालवयातच असंख्य संकटांचा सामना करून मोठे झालेले दोन मातृह्रदयी महापुरूष… दोघेही लहानपणापासून बंडखोर… क्रांतिकारक. श्रीकृष्णाला जन्मतःच आई वडिलांचा विरह… कारण, कंस राजाची जुलमी राजवट. ज्ञानेश्वरादि भावंडांच्या नशिबी…
-
माहितीच्या महापुरात दिसलेली तीन माणसे आणि त्यांच्या तीन बातम्या – महेश म्हात्रे
•
माहितीच्या युगात, आधुनिक तंत्रज्ञान जिवनव्यापी… इतके की, जीव गुदमरतो…क्षणोक्षणी, त्याला जोड प्रसार माध्यमांची, ढगफुटी व्हावी तशा अंगावर येणार्या बातम्यां… थोड्या आवश्यक, बहुतेक निरर्थक… आणि त्या अफाट प्रवाहात आपण वाहून चाललोय, जोरात. आमचे पाय अधांतरी, नाका – डोळ्यात जातंय पाणी, अनावश्यक शब्दांचे… च्याट जीपीटी रुतून बसलाय मेंदूत बोटं करताहेत स्क्रोल, अविरत…
-
आदरणीय जगन्नाथ शंकर शेठ यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
•
देशासाठी, देशबांधवांसाठी आपली संपत्ती “लुटवणारा” धनाढ्य मराठी माणूस म्हणजे नाना शंकर शेठ ! ठाणे जिल्ह्यातील मुरबाड सारख्या छोट्या गावात जन्मलेले नाना “मुंबईचे आद्य शिल्पकार” होते. आपल्या व्यापार कौशल्याने एकोणिसाव्या शतकात अपार धनसंपत्ती मिळवणार्या नाना शंकर शेठ यांनी, या पैशाचा विनियोग स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबीयांसाठी न करता त्यातून समाजकार्याचा प्रपंच उभारला.…