Category: Blog
-

आजचा दिवस… मोठा भाग्याचा! – महेश म्हात्रे
•
आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्य दिन, एकत्र. गेल्या अनेक वर्षात असा योग आला नव्हता… ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण…. अगदी बालवयातच असंख्य संकटांचा सामना करून मोठे झालेले दोन मातृह्रदयी महापुरूष… दोघेही लहानपणापासून बंडखोर… क्रांतिकारक. श्रीकृष्णाला जन्मतःच आई वडिलांचा विरह… कारण, कंस राजाची जुलमी राजवट. ज्ञानेश्वरादि भावंडांच्या नशिबी…
-

माहितीच्या महापुरात दिसलेली तीन माणसे आणि त्यांच्या तीन बातम्या – महेश म्हात्रे
•
माहितीच्या युगात, आधुनिक तंत्रज्ञान जिवनव्यापी… इतके की, जीव गुदमरतो…क्षणोक्षणी, त्याला जोड प्रसार माध्यमांची, ढगफुटी व्हावी तशा अंगावर येणार्या बातम्यां… थोड्या आवश्यक, बहुतेक निरर्थक… आणि त्या अफाट प्रवाहात आपण वाहून चाललोय, जोरात. आमचे पाय अधांतरी, नाका – डोळ्यात जातंय पाणी, अनावश्यक शब्दांचे… च्याट जीपीटी रुतून बसलाय मेंदूत बोटं करताहेत स्क्रोल, अविरत…
-

आदरणीय जगन्नाथ शंकर शेठ यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
•
देशासाठी, देशबांधवांसाठी आपली संपत्ती “लुटवणारा” धनाढ्य मराठी माणूस म्हणजे नाना शंकर शेठ ! ठाणे जिल्ह्यातील मुरबाड सारख्या छोट्या गावात जन्मलेले नाना “मुंबईचे आद्य शिल्पकार” होते. आपल्या व्यापार कौशल्याने एकोणिसाव्या शतकात अपार धनसंपत्ती मिळवणार्या नाना शंकर शेठ यांनी, या पैशाचा विनियोग स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबीयांसाठी न करता त्यातून समाजकार्याचा प्रपंच उभारला.…
-

आनंददायी श्रावण महिन्याचा आरंभ बिंदू…
•
श्रावणसूक्त ! हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला…. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या शब्दातून उमटलेल्या या शब्दओळी श्रावणाचे सोनकोवळे, आरस्पानी रूपसौंदर्य मोठ्या नजाकतीने डोळ्यासमोर उभे करतात. हा महिना खरंच हसरा आणि नाचरा आहे. त्याच्या प्रत्येक…
-

आठवण पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या कवीची
•
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, कवी आणि सामाजिक बांधिलकी मानत पुस्तक – वाचन चळवळ चालवणारे लोभस व्यक्तिमत्त्व सतीश काळसेकर यांचा आज चौथा स्मृतीदिन… पेण येथील कवी,लेखक, कलाकार, चित्रकार, पत्रकार यांनी एकत्र येऊन बांधलेल्या “चित्रकुटिर” मध्ये ते अखेरपर्यंत राहिले. त्या निसर्गरम्य गृहसंकुलाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. कारण विविध…
-

अरेरे… डॉ आंबेडकर यांचेही घराणे फुटले
•
महाराष्ट्रात राजकारण दररोज नवीन वळणे घेत आहे… त्या वेगाने घराघरामध्ये संघर्ष सुरू झाला आहे… मग त्याला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब तरी कसे अपवाद राहील… ? राजकीय जाण, वस्तुस्थितीचे भान आणि निवडणुकीतील मतांच्या प्रमाणाचे ज्ञान हरवलेल्या, मराठी माध्यमांच्या मते, “महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
-

ठाकरी भाषा; घोर निराशा
•
काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे संपलेला पक्ष असल्याचे म्हटले होते. आपला नेताच असे बोलतो म्हंटल्यावर उद्धव सेनेतील अन्य नेतेही मनसे विरोधात बोलू लागले. मग तेव्हापासून मनसेकडून शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नव्हती. हिंदी सिनेमात येते, तसे अचानक एक भाषिक वळण येते… हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर, दोन्ही ठाकरेंना…
-

पंढरीच्या वारीत राजकीय पक्षांचे प्रचार रथ हवेत कशाला?
•
देहू – आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये चालणारी लक्ष, लक्ष पावले जरी निघालेली असतात पंढरपूरला, सावळ्या विठ्ठलाच्या ओढीने, पण त्यांच्या ओठी असतो ‘ग्यानबा – तुकाराम’चा अखंड गजर. वारकरी उठता – बसता सदैव आठवत असतात, स्मरत असतात, माउली ऽ माउली… म्हणून, या संपूर्ण दिंडीत, जिथे जाईल तिथे, ज्ञानेश्वर माउलींचा रथ महत्वाचे आकर्षण…
-

अभिजात मराठी “कोसळते” तेव्हा…
•
आज सकाळी , नेहमीप्रमाणे सगळी वृत्तपत्रे घेऊन बसलो होतो. आधी मराठी वर्तमानपत्रांचा गठ्ठा काढला आणि धक्काच बसला. जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रांनी “कोसळले” याच शब्दाला प्राधान्य दिलेले दिसले. “एअर क्रॅश” या शब्दाचे भाषांतर करताना केलेले ” विमान कोसळले” हे भाषांतर चुकीचे नाही. पण जेव्हा आपण ‘क्रॅश’ हा शब्द अचानक आणि जोरदार अपघात…
-

‘स्नेहवन’ : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी आशेचं किरण
•
पुणे : आयटीची गलेलठ्ठ पगार असलेली नोकरी सोडून अशोक देशमाने यांनी उभं केलेलं ‘स्नेहवन’ ठरतंय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि आई किंवा वडील नसलेल्या मुला-मुलींसाठी आशेचा किरण. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे 2015 साली परभणीच्या अशोक देशमाने यांनी हे स्नेहवन प्रकल्प सुरू केले होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, आर्थिक परिस्थिती नसललेल्या आई किंवा वडील…
