Category: News and Updates
-

उर्दू भारतीय भाषा, कोणत्याही धर्माशी तिचा संबंध नाही; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
•
उर्दू ही लोकभाषा आहे. ती कोणत्याही धर्माशी जोडलेली नाही आणि मराठीसह तिच्या वापरावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,” असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेच्या उर्दू फलकाला विरोध करणारी याचिका मंगळवारी फेटाळून लावली.भाषिक विविधतेचा आदर राखणे गरजेचे असून, उर्दूसह सर्व भाषांशी मैत्री करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत न्यायमूर्ति…
-

जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवरही भारताची आर्थिक वाटचाल मजबूत; रिपोर्टनुसार २०२५ मध्ये ६.५% वाढीचा अंदाज
•
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असतानाही भारताची अर्थवृद्धी वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेने (UNCTAD) प्रसिद्ध केलेल्या ‘ट्रेड अॅण्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट अपडेट २०२५’ या अहवालानुसार, भारताची अर्थव्यवस्था चालू वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये ६.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारत जगातील सर्वांत वेगाने…
-

मध्य प्रदेशात प्राण्यांवरील क्रौर्याची दोन गंभीर प्रकरणे : भिंडमध्ये एका कुत्र्याचे दात पक्कडाने उपटल्याचा अघोरी प्रकार उघड
•
मध्य प्रदेशातील मुरैना आणि भिंड जिल्ह्यांत प्राण्यांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. मुरैनामध्ये एका महिलेने आणि तिच्या मुलाने तीन भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना काठ्यांनी मारून ठार केल्याची घटना समोर आली असून, भिंडमध्ये एका कुत्र्याचे दात पक्कडाने उपटल्याचा अघोरी प्रकार उघड झाला आहे. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत.…
-

देशातील पहिली एटीएम सेवा आता धावत्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये; प्रवाशांना मिळणार प्रवासादरम्यान रोख रकमेची सोय
•
धावत्या रेल्वेत रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मध्य रेल्वेचा उपक्रम यशस्वी ठरला आहे. मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम सेवा सुरू करण्यात आली असून, ही सुविधा मिळवणारी देशातील पहिलीच एक्सप्रेस ट्रेन आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्रवासादरम्यानही सोयीस्करपणे पैसे काढता येणार असून, याचा थेट फायदा प्रवाशांसह रेल्वेच्या…
-

उष्णतेच्या झळांमुळे राज्यात फळबागा आणि भाजीपाला करपला
•
राज्यात अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांवर पोहोचल्यामुळे तीव्र उष्णतेच्या झळांनी फळबागा, भाजीपाला आणि नव्याने लावलेली रोपे करपत आहेत. केळी, स्ट्रॉबेरी, पपई, डाळिंब, कलिंगड, काकडी आणि पालेभाज्यांवर याचा थेट परिणाम दिसून येत आहे. उन्हाळी पावसाने दिलासा न दिल्यास मोठ्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांमध्ये तीव्र तापमानामुळे…
-

‘बनावट डॉक्टर’ प्रकरणाचा परिणाम : दामोहच्या मिशन हॉस्पिटलचा परवाना तात्पुरता निलंबित
•
हृदयरोगतज्ज्ञ असल्याचा बनावट दावा करणाऱ्या डॉक्टरमुळे झालेल्या रुग्णमृत्यूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादानंतर, दामोह येथील मिशन हॉस्पिटलची नोंदणी तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ. एम. के. जैन यांनी बुधवारी दिली. डॉ. जैन यांनी स्पष्ट केले की, हॉस्पिटलला नवीन रुग्ण दाखल करण्यास मनाई…
-

मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण! मनोज जरांगेंनी दिला सरकारला ‘हा’ इशारा
•
मराठा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट करत ‘कुणबी प्रमाणपत्र’ देण्यासह इतर मागण्यांबाबत ३० एप्रिल २०२५ ही अंतिम मुदत असून, त्याआधी सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर थेट मुंबईत आंदोलन उभारू, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे यांनी बुधवारी शाहगड…
-

संस्कृत साहित्याचे डिजिटायझेशन : आयआयटी-मुंबई पदवीधराची मोफत ऑनलाईन ज्ञानसंपदा
•
आयआयटी-मुंबईचे पदवीधर आणि सॉफ्टवेअर अभियंता अंतरिक्ष बोथाले यांनी प्राचीन संस्कृत साहित्य सर्वसामान्यांपर्यंत मोफत व सुलभ स्वरूपात पोहोचविण्याच्या उद्देशाने SanskritSahitya.org हे संकेतस्थळ सुरू केले आहे. भाषा आणि संगणकीय भाषाशास्त्रातील त्यांचा व्यासंग या अभिनव उपक्रमामागे आहे. संस्कृत ग्रंथांचे डिजिटायझेशन आणि त्यावरील अभ्यास सुसंगत पद्धतीने साधण्यासाठी त्यांचे हे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. राजस्थानच्या…
-

ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : ‘स्त्री’ ही संज्ञा केवळ जैविक लिंगापुरतीच मर्यादित
•
ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार ‘स्त्री’ ही कायदेशीर संज्ञा केवळ जैविक स्त्रियांनाच लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ट्रान्स समुदायामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी ब्रिटन सरकारने या निर्णयाचे स्वागत करत कायदेशीर स्पष्टतेची गरज पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. हा निर्णय २०१० च्या समानता कायद्यातील व्याख्येवर आधारित…
-

अंबाजोगाई ठरणार महाराष्ट्रातील तिसरे ‘कवितेचे गाव’; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
•
आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान असलेल्या अंबाजोगाई शहराला ‘कवितेचे गाव’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी बीड दौऱ्यावर केली. अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील तिसरे कवितेचे गाव ठरणार आहे. यापूर्वी केशवसुतांचे मालगुंड व कुसुमाग्रजांचे शिरवाडे या गावांना कवितेचे गाव म्हणून मान्यता देण्यात…
