Category: News and Updates
-

सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा; प्रकल्पांच्या झाडतोड परवानग्या रद्द होण्याची शक्यता
•
मुंबई : शहरातील विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड करण्यात आली असताना, त्याबदल्यात होणाऱ्या भरपाई वनीकरणाची अंमलबजावणी नीट न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला तीव्र शब्दांत फटकारले. न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल्वे, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) आणि तत्सम प्रकल्पांसाठी दिलेल्या झाडतोड परवानग्या रद्द करण्याचा इशाराही दिला आहे. मुंबई महानगरपालिकेने…
-

‘भाजप कुबड्यांवर नव्हे, स्वबळावर मजबूत’ अमित शहा यांचे सूचक वक्तव्य
•
मुंबई : महाराष्ट्रातील भाजप आता कोणाच्याही “कुबड्यांवर” अवलंबून नसून स्वतःच्या बळावर मजबूत आणि सक्षम पक्ष म्हणून उभा राहिला आहे, असे सूचक विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, हे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे निर्देशित असल्याची…
-

मराठी रंगभूमीवर शोककळा : ‘वस्त्रहरण’चे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन
•
मराठी रंगभूमीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध नाटककार आणि ‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी सोमवारी (२७ ऑक्टोबर) रात्री १० वाजून ४० मिनिटांनी निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोकणातून आलेले गवाणकर हे…
-

पुण्यात पहिला ‘एमपी क्रीडा महोत्सव’; ३५ खेळ, १५ दिवसांचा क्रीडा जल्लोष
•
पुणे : केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुणे शहरात पहिल्यांदाच ‘एमपी स्पोर्ट्स फेस्टिव्हल’ म्हणजेच ‘एमपी क्रीडा महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. हा भव्य क्रीडा सोहळा २ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार असून, संपूर्ण शहरात १५ दिवस क्रीडामय वातावरण…
-

मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; “नोट चोरी बंद झाल्याने आता व्होट चोरीचे आरोप”
•
नागपूर – मतदारयाद्यांची सखोल फेरतपासणी (SIR) करण्याच्या निर्णयावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. “विरोधक निराश झाले आहेत. त्यांचा पराभव निश्चित असल्याने ते आधीच ‘कव्हर फायर’ करत आहेत. नोट चोरी थांबल्यामुळे आता ते व्होट चोरीचे आरोप करत आहेत,” असा टोला फडणवीसांनी लगावला. फडणवीस म्हणाले,…
-

उत्तर कोकणच्या रस्त्यांची दयनीय अवस्था; विकासाच्या वाटेवरील मोठा अडथळा
•
पालघर : उत्तर कोकणातील रस्त्यांची बिकट अवस्था आता गंभीर स्वरूप धारण करत असून यामुळे विकासाची गती थांबली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रीकल्चर फाऊंडेशनने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठवले आहे. हे निवेदन केवळ एक पत्र नसून संपूर्ण पालघर जिल्हा आणि उत्तर कोकणातील…
-

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन अखेर धावणार; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण
•
माथेरान : : दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारी ऐतिहासिक नेरळ-माथेरान मिनी ट्रेन यंदा अखेर १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अनियमित पावसामुळे यंदा ट्रेन वेळेवर सुरू होऊ शकली नव्हती. पावसामुळे रेल्वेमार्गावर झालेल्या नुकसानामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने काही काळासाठी सेवा स्थगित ठेवली होती. मात्र सर्व दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर अखेर ही पारंपरिक…
-

देशभरात आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक फुकट पगारावर
•
नवी दिल्ली : देशभरातील जवळपास ८ हजार शाळांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही, अशी धक्कादायक माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. या शाळांमध्ये कार्यरत असलेले २०,८१७ शिक्षक कोणतेही अध्यापनकार्य न करता पगार घेत आहेत, हे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील ३८१२…
-

मुंबईत ‘इंडियन मॅरिटाईम वीक २०२५’; अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन
•
मुंबईत आज (२७ ऑक्टोबर) पासून सुरू होणाऱ्या ‘भारत सागरी आठवडा २०२५’ (India Maritime Week 2025) या भव्य सागरी परिषदेकडे संपूर्ण देशाचं आणि जगाचं लक्ष लागलं आहे. नेस्को मैदान (बॉम्बे प्रदर्शन केंद्र) येथे होणाऱ्या या पाच दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन बंदर, जलमार्ग आणि नौकानयन मंत्रालयाने तसेच भारतीय बंदर संघटनेने संयुक्तपणे केलं आहे.…
-

केरळ होणार देशातील पहिलं ‘अत्यंत दारिद्र्य मुक्त राज्य’
•
तिरुअनंतपुरम – केरळ राज्य १ नोव्हेंबर २०२५ रोजी देशातील पहिलं “अत्यंत दारिद्र्य मुक्त राज्य” म्हणून घोषित होणार आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते राजधानी तिरुअनंतपुरममधील सेंट्रल स्टेडियम येथे हा ऐतिहासिक कार्यक्रम होणार असून, अभिनेते मोहनलाल, ममूटी आणि कमल हासन हे या सोहळ्याचे विशेष पाहुणे असतील. स्थानिक स्वराज्य मंत्री एम. बी.…
