Category: News and Updates
-

विधवा महिलेला सासऱ्यांच्या मालमत्तेतून भरणपोषणाचा हक्क : दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
•
नवी दिल्ली : विधवा महिलेला तिच्या सासऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून भरणपोषणाचा दावा करण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे विधवा महिलांच्या आर्थिक हक्कांबाबतचा एक महत्त्वाचा प्रश्न स्पष्ट झाला आहे. न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरिश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर सासऱ्यांकडे…
-

सरकारी अधिकार्यांच्या परदेश दौऱ्यांवर सरकारचा नवा नियम
•
मुंबई : सरकारी सेवेत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांच्या परदेश दौऱ्यांवर आता सरकारने नवा अंकुश लावला आहे. यानुसार कोणताही परदेश दौरा केवळ सरकारच्या परवानगीनेच करता येणार असून, त्याबाबत सविस्तर तपशील सादर करावा लागणार आहे. अनेकदा काही अधिकारी खासगी संस्थांच्या खर्चाने परदेश दौऱ्यांवर जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. यापुढे अशा…
-

कोल्हापुरात ‘अभिजात मराठी गौरवार्थ’ दिनमान साहित्य उत्सव
•
कोल्हापूर – महाराष्ट्र दिनमान’कडून कोल्हापुरात ‘अभिजात मराठी गौरवार्थ’ दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात हे साहित्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. डी. वाय. पाटील समूह, कोल्हापूर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम २४ आणि २५ ऑगस्ट रोजी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या साहित्य उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार…
-

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
राज्यातील शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
-

लाडकी बहिण योजनेतील गैरव्यवहार: सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, १२ हजार पुरुषांच्या खात्यांची चौकशी
•
लाडकी बहिण’ योजनेतील हा गैरव्यवहार उघड झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.
-

लातूर पॅटर्न पुन्हा अव्वल, १२९३ विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी पात्र; नांदेड दुसऱ्या स्थानी
•
वैद्यकीय प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर हे एक प्रमुख केंद्र बनले आहे, कारण येथील शिक्षणाची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट मानली जाते
-

बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या
•
चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती, जी त्यांच्या खिशात सापडली. या चिठ्ठीत आत्महत्येचे कारण नमूद असल्याचे सांगितले जात आहे.
-

तुळजाभवानी मंदिरात आजपासून पुन्हा जवळून दर्शनाची सुविधा
•
मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळगे यांनी सांगितले की, भाविकांना आता चोपदार दरवाज्यापासून कमी वेळेत दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे.
-

राज ठाकरे यांचे वक्तव्य: ‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा, ते खराब झालेच पाहिजेत’
•
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील खराब रस्त्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा आहे, ते खराब झालेच पाहिजेत’ असं वक्तव्य केलं, ज्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. भ्रष्टाचाराचा आरोप…
-

‘नथुराम गोडसे व्हावे लागेल’ या धमकीनंतर थोरातांच्या समर्थनार्थ संगमनेरात मोर्चा
•
राज्यातील राजकारण आणि अध्यात्मिक क्षेत्रातील एका मोठ्या वादाची सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहादरम्यान झालेल्या वादावरून, कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना “नथुराम गोडसे व्हावे लागेल” अशी धमकी दिली. या धमकीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नेमका वाद…
