Category: News and Updates
-

समृद्धी महामार्गावर एका महिन्यात ११ लाख वाहने धावले; ९० कोटी रुपयांचा टोल जमा
•
मुंबई: नागपूर ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून, अवघ्या एका महिन्यात या महामार्गावरून तब्बल ११ लाख वाहनांनी प्रवास केला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) तिजोरीत ९० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किलोमीटर लांबीचा महामार्ग यापूर्वीच…
-

पत्नीला ठोस कारणाशिवाय पोटगी मिळणार नाही: अलाहाबाद हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
•
प्रयागराज: अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निर्णयात स्पष्ट केले आहे की, जर पत्नी ठोस आणि वैध कारणाशिवाय पतीपासून वेगळी राहत असेल, तर तिला पोटगी किंवा निर्वाह भत्ता मिळणार नाही. उच्च न्यायालयाने मेरठ कौटुंबिक न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करताना हा निकाल दिला. मेरठ न्यायालयाने पतीला पत्नीला दरमहा ५,००० रुपये निर्वाह भत्ता…
-

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘जनसुरक्षा’ला विरोध म्हणजे डाव्यांचेच समर्थन
•
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जनसुरक्षा’ कायद्याला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. जे लोक या विधेयकाचे एकही अक्षर न वाचता विरोध करत आहेत, ते एका प्रकारे जहाल डाव्यांचे समर्थन करत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी नागपूर येथे केले. सरकारविरोधात बोलण्याचा किंवा आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट…
-

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट
•
मुंबई: महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील एका किल्ल्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण १२ ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ‘एक्स’ (X) वर ही आनंदाची बातमी दिली. या किल्ल्यांमध्ये स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, तसेच…
-

एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांना दिली कडक शब्दात समज
•
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची प्रतिमा त्यांच्याच नेत्यांच्या वादग्रस्त कृत्यांमुळे डागाळली आहे. विशेषतः आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे शिंदे अडचणीत आले आहेत. या नेत्यांच्या कारनाम्यांनी पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याने शिंदे कमालीचे नाराज असून, त्यांनी दोघांनाही कडक शब्दांत समज दिल्याचे समजते.आमदार संजय…
-

अहमदाबाद विमान अपघाताचे कारण आले समोर; AAIB च्या अहवालातून धक्कादायक खुलासा
•
अहमदाबाद: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत भारतीय विमान दुर्घटना तपास ब्युरो (AAIB) ने आपला प्राथमिक अहवाल (१५ पानांचा) जारी केला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, विमान टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच दोन्ही इंजिने अचानक बंद पडल्याचे उघड झाले आहे. यामुळे विमान कोसळण्याची…
-

जयंत पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष
•
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP-SCP) राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या सात वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणारे जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात येणार आहे. नेतृत्वात हा बदल पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी महत्त्वाचा मानला जात…
-

मंत्री संजय शिरसाट यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरुन खळबळ; पैशांची बॅग की कपडे?
•
शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या एका कथित व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाट पैशांच्या बॅगा घेऊन बसले असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर, शिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते एका मोठ्या बॅगेजवळ बसलेले दिसत आहेत. राऊतांचा दावा खरा ठरल्याची…
-

मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई; मंत्री शंभुराज देसाईंचा इशारा
•
मुंबईत घरे खरेदी करताना कोणत्याही मराठी माणसाचा हक्क डावलला जाणार नाही. मराठी माणसाला घरे नाकारणाऱ्या बिल्डर्स आणि व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्रावर आणि विशेषतः मुंबईवर सर्वात पहिला हक्क मराठी माणसाचाच आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-

सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ घोषित
•
मुंबई: शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता महाराष्ट्राचा ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत ही महत्त्वाची घोषणा केली. पीओपी मूर्तींवरील निर्बंध बाजूला, निर्मितीला परवानगी या घोषणेसोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी गणेश मूर्तींवरील निर्बंधांबाबतही विधान केले. पीओपी (प्लॅस्टर…
