Category: News and Updates
-

मुख्यमंत्री फडणवीसांकडून सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कार्याचे कौतुक: जनहिताचे निर्णय आणि साधेपणाची प्रशंसा
•
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश गवई यांच्या जनहितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची प्रशंसा केली, तसेच त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से सांगितले. फडणवीस म्हणाले की, हा क्षण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, कारण महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी…
-

मंत्री प्रताप सरनाईकांचा मराठी भाषिकांच्या मोर्चातून काढता पाय: तीव्र घोषणाबाजी आणि बाटलीफेकीमुळे गोंधळ
•
ठाणे : आज ठाण्यात मराठी भाषिकांनी काढलेल्या एका महत्त्वाच्या मोर्चाला संबोधित करण्यासाठी पोहोचलेले राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रचंड जनक्षोभाचा आणि तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. मोर्चेकऱ्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, त्यांच्या दिशेने बाटली फेकल्याने एकच गोंधळ उडाला आणि अखेर सरनाईक यांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला. सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी…
-

बीडमध्ये सावकारी जाचातून व्यावसायिकाची आत्महत्या; “पत्नीला घरी आणून सोड” अशी धमकी
•
बीड: सावकारीच्या क्रूर जाचाला कंटाळून बीडमध्ये एका कापड व्यावसायिकाने आपले जीवन संपवले आहे. वेळेवर पैसे न दिल्यास, “तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड” अशी धक्कादायक धमकी सावकाराने दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे राम फटाले यांनी…
-

पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईकांचा रास्ता रोको
•
कळंब (जि. धाराशिव) पोलिसांच्या कथित मारहाणीत मुरूड तालुक्यातील ढोराळा येथील भैरू येडबा चौधरी (वय ४०) या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, त्यांच्या नातेवाईकांनी सोमवारी (७ जुलै २०२५) मुरूड बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी यावेळी लावून धरली. मिळालेल्या माहितीनुसार, भैरू चौधरी यांना शुक्रवारी (४ जुलै…
-

पोलिस कर्मचाऱ्यांकडून बॅटऱ्या आणि दुचाकींची चोरी; बीडमध्ये खळबळ
•
बीड : ड्रीम इलेव्हन (Dream 11) आणि रमी (Rummy) ॲप्समध्ये पैसे गमावल्याने कर्जबाजारी झालेल्या एका सहायक फौजदाराने कर्ज फेडण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पोलीस कर्मचाऱ्याने सुरुवातीला बॅटऱ्या चोरल्या आणि जामिनावर सुटल्यानंतर त्याने सात दुचाकींचीही चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, ज्यात हा…
-

संभाजीनगर व्हिट्स हॉटेल प्रकरण: उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा, मंत्रीपुत्रावरील आरोपांनी वादंग
•
छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेलच्या लिलावावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी नियम डावलून टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला होता. यानंतर विरोधकांनी मंत्री शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृहात गोंधळ घातला. अखेर, उपमुख्यमंत्री…
-

बनावट कागदपत्रांद्वारे २५ वर्षे नोकरी; दोन अधिकारी निलंबित
•
नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात एका महिलेने तिच्या भावजयीच्या नावावर तब्बल २५ वर्षे अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी विधानसभेत समोर आला. या प्रकरणी तक्रार येऊनही कारवाई न केल्याने स्थानिक बालकल्याण प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी…
-

डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करण्याची ‘शालेय शिक्षण अभ्यास व कृती समिती’ची मागणी
•
मुंबई: त्रिभाषा सूत्रासंदर्भात स्थापन करण्यात आलेली डॉ. नरेंद्र जाधव समिती तातडीने रद्द करावी, तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (SCERT) संचालक राहुल रेखावार यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी ‘शालेय शिक्षण अभ्यास व कृती समिती’ने सोमवारी आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. समितीचे निमंत्रक…
-

राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस: मराठवाडा व नागपूर विभागाला अजूनही प्रतीक्षा
•
राज्यात मान्सूनची समाधानकारक प्रगती झाली असून, ७ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरीच्या ९९% पाऊस आतापर्यंत झाला आहे. विशेषतः कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती या चार विभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या दोन विभागांत अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विदर्भात आषाढसरींचा दिलासा सोमवारी विदर्भात आषाढसरींनी…
-

राज्यात लवकरच ‘मेगा भरती’: आदिवासींसाठीची राखीव पदेही भरणार
•
मुंबई: राज्य सरकार लवकरच ‘मेगा भरती’ मोहीम राबवणार असून, यात आदिवासी समाजासाठी राखीव असलेली पदेही भरली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही: * १५० दिवसांचा कृती कार्यक्रम: कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध सुधारणे, नियुक्ती प्रक्रिया सुलभ करणे, आणि…
