Category: News and Updates
-

मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून १ कोटी; जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही उचलणार
•
अहमदाबाद: अहमदाबादजवळ काल (१२ जून २०२५) झालेल्या भीषण विमान अपघातानंतर, एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा समूहाने पीडितांसाठी मोठी घोषणा केली आहे. या दुर्घटनेत ज्या प्रवाशांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला १ कोटी रुपये आर्थिक मदत दिली जाईल, असे टाटा समूहाने जाहीर केले आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन.…
-

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणे पुजाऱ्यांना पडले महागात; ८ जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
•
धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणे आठ पुजाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. मंदिर संस्थानने या पुजाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, समाधानकारक खुलासा न झाल्यास तीन महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात शिस्तभंगाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमके काय…
-

भारतात याआधीही अनेक बड्या नेत्यांनी गमावलाय विमान अपघातात जीव
•
अहमदाबाद : शुक्रवार, १३ जून २०२५: अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून २०२५) झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या ‘बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर’ या प्रवासी विमानाचा सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर भागातील नागरी वस्तीवर…
-

अहमदाबाद विमान अपघातात सांगोल्याचे पवार दाम्पत्य ठार
•
अहमदाबाद: गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात नडियाद (गुजरात) येथील महादेव तुकाराम पवार (वय ६८) आणि आशा महादेव पवार (वय ६०) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे सांगोला तालुक्यातील हातिद गावचे रहिवासी होते आणि लंडन येथे आपल्या मुलाकडे जाण्यासाठी निघाले होते. या घटनेने सांगोला आणि नडियाद परिसरात…
-

अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर; निना कुलकर्णी यांना ‘जीवनगौरव’ जाहीर
•
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने (अभामानाप) २०२४ वर्षासाठीचे आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले. यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेत्री निना कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी नाट्यसृष्टीतील त्यांच्या प्रदीर्घ आणि अतुलनीय योगदानाचा हा गौरव आहे. प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनापित्यार्थ 14 जून…
-

अहमदाबाद विमान दुर्घटनेत सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू; कारण अस्पष्ट
•
अहमदाबाद, : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोइंग ७८७-८ (Air India Boeing 787-8) विमानाला आज दुपारी भीषण अपघात होऊन, विमानात असलेल्या सर्व २४२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ पायलट, १० क्रू सदस्य आणि २३० प्रवाशांचा समावेश आहे. टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान मेघानी नगर परिसरातील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या…
-

आधार पडताळणीशिवाय तत्काळ तिकीट बुक करता येणार नाही, १ जुलैपासून नियम लागू
•
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता वापरकर्ते आधार प्रमाणीकरणाशिवाय तत्काळ रेल्वे तिकिटे बुक करू शकणार नाहीत. मंत्रालयाने स्पष्ट केले की तिकीट बुकिंगबाबतचा हा मोठा बदल (तत्काळ तिकीट बुकिंग नियम बदल) १ जुलै २०२५ पासून लागू केला जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडेच रेल्वे…
-

मोठी दुर्घटना : अहमदाबाद शहरात 242 प्रवासी घेऊन जाणारे विमान कोसळले
•
अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद शहरात प्रवाशांना घेऊन निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले. लंडनला जाणारे विमान शहरातील मेघानी भागात कोसळले, ज्यामुळे काळ्या धुराचे मोठे लोट पसरले आणि तातडीने आपत्कालीन मदत सुरू…
-

उद्धव ठाकरे यांची शिवसेना एमआयएमशी युती करू शकते: संजय शिरसाट स्पष्टच बोलले
•
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना, शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा गट) भविष्यात एमआयएम (AIMIM) या पक्षाशी देखील युती करू शकते, असे स्पष्ट मत शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय…
-

छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या
•
तुळजापूर: येथील एका धक्कादायक घटनेत, एका पोलीस कॉन्स्टेबलच्या अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात आणि विशेषतः पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी ही तुळजापूर येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलची मुलगी होती. तिने शहरातील पोलीस वसाहत, एसटी कॉलोनी…
