Category: News and Updates
-

स्थानकांच्या बाहेर ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन; पश्चिम रेल्वेचा महत्वाचा निर्णय
•
पेट्रोल- डिझेल महाग झाल्याने सध्या ई-वाहन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जागोजागी ईव्ही चार्जिंग सेंटर असणंही तितकंच गरजेचं झालं आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने त्यांच्या सर्व स्थानकांच्या बाहेर ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याची योजना आखली आहे. आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यावर या सुविधा उभारण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मुंबई…
-

राहुल गांधींच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे उत्तर
•
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयोगाकडून सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी थेट पत्र लिहिले तरच ही संवैधानिक संस्था उत्तर देईल. त्यांनी सांगितले की, त्यांच्या संपर्क मोहिमेचा भाग म्हणून, निवडणूक आयोगाने सर्व 6 राष्ट्रीय पक्षांना स्वतंत्र…
-

‘सर्व शासकीय कार्यालयांमध्ये डिसेंबर २०२५ पर्यत सौर ऊर्जेचा वापर होणार” : देवेंद्र फडणवीस
•
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी औंध परिसरात महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेच्या (मेडा) नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. ते म्हणाले राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये डिसेंबर २०२५ पर्यत सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात येणार असून, प्रधानमंत्री सूर्यघर योजना राज्यात प्रभावीपणे राबविली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. औंध…
-

राजीनामाच न्या. वर्मा यांना महाभियोगापासून वाचवू शकतो
•
नवी दिल्ली : न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा दिल्यास ते महाभियोगपासून वाचू शकतात, असं सांगितलं जातं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही सभागृहात खासदारांसमोर आपला खटला सादर करताना, न्यायमूर्ती वर्मा हे पद सोडत असल्याचे घोषित करू शकतात आणि त्यांचे तोंडी निवेदन हे त्यांचे राजीनामा मानले जाईल. जर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तर…
-

मुंबईत लोकल ट्रेनमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू
•
मुंबई : सोमवारी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये मोठा अपघात झाला. चालत्या ट्रेनमधून आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले, त्यापैकी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेचे म्हणणे आहे की दिवा-कोपर रेल्वे स्टेशन दरम्यान हा अपघात घडला. मध्य रेल्वेचे म्हणणे आहे की काही प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये…
-

आर्थर रोड कारागृहासाठी नवीन प्रस्ताव द्या, मंत्री योगेश कदम यांचे निर्देश
•
मुंबई: गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृह आणि भायखळा महिला कारागृहासाठी तुरुंग कर्मचारी आणि कैद्यांच्या गरजा लक्षात घेऊन सुधारित आणि व्यापक पुनर्विकास प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सचिवालय (मंत्रालय) येथे झालेल्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना कदम म्हणाले की, सध्याची आर्थर रोड सुविधा जीर्ण…
-

या तारखेला होणार NEET PG ची प्रवेश परीक्षा; सर्वोच्च न्यायालयाने दिली एनबीईला परवानगी
•
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला (NBE) NEET PG प्रवेश परीक्षा २०२५ ची तारीख बदलण्याची परवानगी दिली आहे. ही परीक्षा १५ जून रोजी होणार होती, परंतु त्यापूर्वी NBE ने सर्वोच्च न्यायालयाला परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी केली होती. काही विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना, ३० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने NEET परीक्षा…
-

गृह आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार, रेपो दरात कपात
•
कर्ज घेणाऱ्या किंवा कर्जाचे ईएमआय भरणाऱ्या लोकांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा जास्त रेपो दरात कपात केली आहे. ४ जूनपासून सुरू झालेल्या आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) दोन दिवसांच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ५० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.५० टक्के मोठी कपात जाहीर केली.…
-

मुंबईला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी बीएमसीने उचलली अनेक पावले, १७००० कोटी रुपयांचे बजेट
•
मुंबई: पर्यावरण संरक्षणासाठी बीएमसी अनेक पावले उचलत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, बीएमसीच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी गुरुवारी ‘पर्यावरण बजेट अहवाल – २०२५-२६’ सादर केला. गेल्या वर्षीच्या पर्यावरण बजेटपेक्षा हे सुमारे ६० टक्के जास्त आहे. २०२५-२६ च्या पर्यावरण बजेटमध्ये भांडवली खर्चासाठी १७,०६६.१२ कोटी रुपये आणि महसूल खर्चासाठी ३,२६८.९७ कोटी…
-

उधार दाढी न केल्याने धाराशिव शहरातील सलून कर्मचाऱ्यावर हल्ला; गंभीर दुखापत
•
धाराशिव : उधार दाढी कटिंग करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून धाराशिव शहरातील न्यू क्लासिक जेंट्स पार्लर येथे ऋतुराज मोरे या युवकावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ऋतुराज गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ऋतुराज मोरें याने रुग्णालयातून पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तो…
