Category: News and Updates
-

ठाण्यात मागील 24 तासात 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळले; चिंता वाढली
•
ठाणे : कोरोना या महाभयंकर रोगाने पुन्हा तोंड वर करायला सुरुवात केली आहे. राज्यात बधितांची संख्या वरच्यावर वाढत चालली आहे. एकट्या ठाण्यात मागील 24 तासात 11 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे चिंता वाढली आहे. या 11 बाधित रुग्णांपैकी एकावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात, तर उर्वरित सहा जणांवर खासगी…
-

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी चौंडीत येणार
•
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ३१ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. राज्याचे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे त्यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर सभापती राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद…
-

शरद पवार गटाला पाटणमधून मोठा धक्का; हा नेता भाजपच्या वाटेवर
•
सातारा : जिल्ह्यातील पाटणमध्ये शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षाचे पाटण येथील महत्वाचे नेते आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. सत्यजीत पाटणकर हे गेल्या काही वर्षांपासून…
-

अमित शहा यांची नांदेडमध्ये शंखनाद सभा; असा असेल पूर्ण दौरा
•
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा भाग म्हणून रविवारी रात्री नागपूरला पोहोचले. या भेटीदरम्यान ते सोमवार आणि मंगळवारी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. विदर्भातील सर्वात मोठे शहर नागपूर येथे आगमन झाल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) इतर नेत्यांनी शाह यांचे स्वागत केले. नियोजित कार्यक्रमानुसार…
-

७ कोटींहून अधिक लोकांसाठी आनंदाची बातमी; सरकारने पीएफवरील व्याज जाहीर केले!
•
नवी दिल्ली : केंद्र सरकारने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने २०२५ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जाहीर केला आहे. याचा फायदा ७ कोटींहून अधिक लोकांना होईल आणि त्यांच्या पीएफ ठेवींमध्ये वाढ होईल. सरकारने म्हटले आहे की २०२५ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF…
-

ठाण्यात कोरोनामुळे 21वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रशासन अलर्ट मोडवर
•
ठाणे : महाराष्ट्राला धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कळवा रुग्णालयात 21 वर्षीय तरुणाचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथे राहणाऱ्या या 21 वर्षीय तरुणाचा सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला आहे. 22 मे 2025 रोजी साठी उपचारासाठी त्याला कळवा रुग्णालयात…
-

इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने केली भारतीय संघाची घोषणा; या 5 खेळाडूंना संधी नाही
•
मुंबई : बीसीसीआयने शनिवारी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीसह या ५ खेळाडूंना बीसीसीआयने निवडलेल्या संघात स्थान मिळालेले नाही.अय्यर सध्या भारताच्या एकदिवसीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याने गेल्या काही काळापासून उत्तम कामगिरी…
-

‘दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराची नमाज अदा केली जाणार नाही’, प्रमुख इमाम इलियासी यांचा फतवा
•
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांनी एक फतवा जारी केला आहे. ज्यामध्ये दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की भारतात मारल्या गेलेल्या कोणत्याही दहशतवाद्याची अंतिम नमाज कोणताही इमाम किंवा काझी पठण करणार नाही. उमर अहमद इलियासी म्हणाले…
-

लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विभागाचे ३३६ कोटी रुपये हस्तांतरित
•
मुंबई : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ चालवण्यासाठी, सरकारला इतर विभागांकडून निधी घ्यावा लागत आहे. यावेळी लाभार्थी महिलांना पुढील हप्ता देण्यासाठी, सरकारने आदिवासी विभागाकडून ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी हस्तांतरित केला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता भरण्यासाठी, सरकारच्या वित्त विभागाने गेल्या महिन्यात अनुसूचित जाती आणि जमाती विभागाकडून ४१० कोटी…
-

‘फक्त अमेरिकेत आयफोन बनवा’ नाहीतर… ट्रम्प यांनी २५% टॅरिफ लावण्याची धमकी दिली
•
आयफोन उत्पादक कंपनी अॅपलच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलवर २५% कर लादण्याची धमकी दिली आहे. शुक्रवारी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयफोन स्मार्टफोन अमेरिकेत तयार न केल्यास अॅपल उत्पादनांवर २५ टक्के कर लादण्याची धमकी दिली. ट्रम्पच्या धमकीनंतर अॅपल कंपनीत घबराटीचे वातावरण आहे. जर ट्रम्पने त्यावर…
