बीड : मराठवाडा आणि विदर्भाला भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तास वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. बीड जिल्ह्यात नुकतंच मोठ्याप्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडं जमिनीवर कोसळले आहे तर. वादळी वाऱ्यांमुळे एका पेट्रोल पंपाचे नुकसान झाले आहे. आणि पुढील 24 तास बीड सह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान हवामान विभागाने या भागाला सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे.
बीड, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी। तास वेगाने वारे वाहण्याची आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दुसरीकडे विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली येथेही अशीच हवामान परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता ‘वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
प्रशासनाच्या नागरिकांसाठी सूचना
●शेतकरी बांधवांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात
●वाहनचालकांनी वादळी वान्यांमुळे झाडे पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी
●सर्वसामान्य नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे
या हवामान बदलामुळे संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पोहोचण्याची शक्यता
महाराष्ट्रात यंदा लवकरच मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, केरळमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून 27 मे 2025 रोजी पोहोचण्याची शक्यता आहे, जे नेहमीच्या 1 जूनच्या तुलनेत पाच दिवस लवकर आहे. केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतर, महाराष्ट्रात मान्सून सामान्यतः 7 ते 10 दिवसांत पोहोचतो. त्यामुळे, महाराष्ट्रत मान्सून जूनच्चा पहिल्या आठवड्यात 3 ते 6 जून दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे
Leave a Reply