राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्यावर डोळा आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आणि कारण स्वतः चंद्रकांत पाटील यांनी गृहखाते न मिळाल्याने खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘राज्यात सध्या सर्वात ज्येष्ठ मंत्री मी आहे. महत्त्वाच्या सर्व खात्यांचे मंत्रीपद मी भूषवले आहे. आता केवळ गृह खाते शिल्लक राहिल्याची उच्च शिक्षणमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तासगाव येथे एका कार्यक्रमात व्यक्त केली.
पाटील म्हणाले, की सरकारमध्ये मी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे .आता ‘केवळ गृह खात्याचा पदभार हाती येणे बाकी आहे. सध्या गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने मंत्री पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात लगेच चर्चां सुरू झाली आहे. पालकमंत्री या नात्याने पाटील दर आठवड्यास सध्या सांगली दौरा करतात.
चंद्रकांत पाटील यांनी, तासगाव येथील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. येथे मंडळाने सुमारे 4 कोटी 65 लाख रुपये खर्चून भव्य असे दुर्गामाता मंदिर उभारले आहे. या मंदिरात दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीनंतर ते बोलत होते.
दरम्यान त्यांनी खासदार विशाल पाटील यांना पुन्हा एकदा भाजपची ऑफर दिली आहे. विशाल पाटलांनी भाजपत यावे, यासाठी आपण त्यांना सारखी ऑफर देतच राहू असेही त्यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी कधी काळी भाजपचे असणाऱ्या माजी खासदार संजयकाका यांच्या परतीचे दोर कापले असून त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत राहावे असे सल्ला दिला आहे.


Leave a Reply