चॅटजीपीटीच्या ‘स्टुडिओ जिब्लि’ इमेज जनरेटरने सोशल मीडियावर गाजवली धूम; सीएम फडणवीस यांचीही एंट्री!

चॅटजीपीटीच्या नवीन ‘स्टुडिओ जिब्लि’ (Studio Ghibli) इमेज जनरेटरने सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. नेटकऱ्यांमध्ये हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, OpenAI च्या अत्याधुनिक GPT-40 मॉडेलच्या मदतीने हे खास एआय-निर्मित (AI-generated) अॅनिमेटेड फोटो तयार करता येत आहेत. अनेक युजर्स हे फिचर त्यांच्या प्रोफाइल फोटो, मीम्स आणि कलात्मक निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरत आहेत.

सध्या सोशल मीडियावर ‘स्टुडिओ जिब्लि’ स्टाईलमधील चित्रे जबरदस्त चर्चेत आहेत. OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी हा ट्रेंड सुरू केला. त्यांनी स्वतःचा प्रोफाइल फोटो घिब्ली स्टाईलमध्ये बदलला, त्यानंतर अनेक युजर्सनी आपली एआय-निर्मित घिब्ली इमेज शेअर करण्यास सुरुवात केली.

हा ट्रेंड आता भारतीय राजकीय नेत्यांमध्येही पोहोचला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक्स (Twitter) अकाउंटवर स्वतःची जिब्लि इमेज पोस्ट केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही जिब्लि स्टाईल फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 

स्टुडिओ जिब्लि (Studio Ghibli) हा जपानमधील एक प्रतिष्ठित अॅनिमेशन स्टुडिओ आहे. १९८५ मध्ये हयाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता यांनी या स्टुडिओची स्थापना केली. त्यांच्या अॅनिमेटेड चित्रपटांना अद्वितीय कलात्मक शैली, कल्पनारम्य कथानक आणि मानवी भावनांचे सुंदर चित्रण यामुळे जागतिक लोकप्रियता मिळाली आहे.

जर तुम्हालाही जिब्लि स्टाईल फोटो तयार करायचा असेल, तर हे एआय टूल वापरणे अगदी सोपे आहे –

• चॅटजीपीटीमध्ये ‘इमेज क्रिएटर’ (Image Creator) पर्याय निवडा.

• “Can you turn this into a Ghibli-style photo?” किंवा “Show me in Studio Ghibli style.” असा प्रॉम्प्ट द्या.

• तुमच्या फोटोचे जिब्लि स्टाईल व्हर्जन काही सेकंदांत मिळेल.

• GPT-40 मॉडेलला ‘Make a Studio Ghibli version of this image’ असा आदेश द्या.

• तयार झालेली जिब्लि इमेज सोशल मीडियावर शेअर करा आणि ट्रेंडमध्ये सहभागी व्हा!

हे फिचर लाँच करताना OpenAI ने सांगितले की, “हे मल्टीमोडल मॉडेल अत्यंत प्रभावी इमेज निर्मिती सक्षम करते. यामुळे वापरकर्त्यांना अचूक, कलात्मक आणि फोटोरिअलिस्टिक आउटपुट मिळते.” हे जिब्लि स्टाईल इमेज जनरेशन फिचर लोकांना खूप आवडत असून, अनेकजण आपल्या आवडीनुसार फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात हे मॉडेल आणखी प्रगत होईल आणि इतर अनेक शैलींमध्येही इमेज तयार करता येतील. तर मग वाट कसली पाहताय? चॅटजीपीटीचा वापर करून तुमची स्वतःची घिब्ली स्टाईल इमेज तयार करा आणि या ट्रेंडमध्ये सहभागी व्हा!

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *