छगन भुजबळांचा कमबॅक; आज घेणार मंत्रिपदाची शपथ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांच्याबाबतची मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील राजभवनात 50 जणांच्या उपस्थितीत शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. विशेष म्हणजे, छगन भुजबळ यांच्याकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळ धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले होते या आरोपामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.आता अन्न व नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते

महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून दाखवली होती. इतकंच नाही तर त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर देखील अप्रत्यक्षपणे टीका केली होती. मात्र मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनामानंतर भुजबळ यांचा कमबॅक होणार, आशा चर्चा सुरू होत्या. अखेर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ओबीसीचा महत्वाचा चेहरा म्हणून भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे. आता समिकरणाचा निवडणुकीत फायदा होईल का, हे येणार काळच सांगेल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *