बुलढाणा : शिवसेना यूबीटीचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहले आहे. ज्यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले आहे. राऊत यांनी आपल्या पुस्तकात अमित शहा यांना तडीपार असताना बाळासाहेबांनी तर नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीच्या प्रकरणात कसे वाचवले, याबाबत मोठे दावे केले आहे. ईडीच्या कारवाईत संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी, 100 दिवस कारागृहात असलेल्या खासदार संजय राऊत यांनी तेथील अनुभवावर आधारीत ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राऊत यांच्या पुस्तकाबद्दल विचारले असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. बालसाहित्य वाचण्याचे माझे वय राहिले नाही, असं ते म्हणाले.
काय म्हणाले फडणवीस?
फडणवीस म्हणाले, कथा कादंबऱ्या आणि बाल वाड्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, संजय राऊत काही खूप मोठे नेते नाहीत, त्यांच सोडून द्या, असेही फडणवीसांनी म्हटलं. संजय राऊतांच्या ‘त्या’ पुस्तकाच नाव बद्दलण्याची गरज आहे. नरकातला राऊत असं पुस्तकाचं नाव ठेवावं, संजय राऊत यांना यासाठी पत्रही पाठवणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच, या पुस्तकात स्वत:च राजकीय अधिपतन कसं असतं याचा लेखाजोखा मांडला, नैतिक दिवाळखोरीची कहाणी लिहिली आहे. भाजप सेना युती सर्वोत्तम होती, या युतीला बाळासाहेब ठाकरे यांनी न्याय देण्याचा काम केले. संजय राऊत सारख्या व्यक्तीनेच शिवसेना संपवली, हिंदुत्व विचारांशी फारकत घेऊन काँग्रेसचा दावणीला उद्धव ठाकरे यांना बांधण्याच काम केल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले.
Leave a Reply