राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयाच्या पावन दिवशी दोन मोठ्या गुडन्यूज दिल्या आहेत. फडणवीस दांपत्याची कन्या दिविजा फडणवीस हिने दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली आहे, यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केला आहे.अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर पोस्ट शेअर करत याबद्दलची गुडन्यूज दिली आहे.
अमृता फडणवीस यांनी काही वेळापूर्वी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक आनंदाची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लेक दिविजा फडणवीस हिचा दहावीचा निकाल जाहीर झाल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच फडणवीस कुटुंबाने अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी गृहप्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा! आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे”, असे अमृता फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्याने विचारलं जात होतं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी कधी रहायला जाणार? यावर अखेर स्वत: फडणवीसांनी स्पष्ट उत्तर दिलं होतं.फडणवीस म्हणाले ,एकनाथ शिंदेंनी वर्षा सोडल्यावर मला तिथे जायचं आहे. मात्र, त्याआधी काही लहानसहान दुरुस्तीची कामं सुरू होती. या काळात माझी मुलगी दहावीत होती आणि तिच्या परीक्षा सुरू होत्या. ती म्हणाली,परीक्षेनंतर आपणच शिफ्ट होऊ’,म्हणून मी काही शिफ्ट झालो नाही.परीक्षा झाल्यावर शिफ्ट होईन असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होते.
Leave a Reply