मुंबई: मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे आणि बेधुंद विधानांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आता जाते ते खूप झाले, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना फटकारले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.
थेट कारवाईचा इशारा
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, यापुढे बेशिस्त वर्तन करणाऱ्या मंत्र्यांवर थेट कारवाई केली जाईल. मंत्र्यांना या नियमावलीची जाणीव व्हावी, असे त्यांनी सूचित केले. मंत्रिमंडळ बैठकीत अध्यक्षस्थानी असताना मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढत, मंत्र्यांना सांगितले की, “तुम्ही वागतात विधाने व कृती आता अजिबात खपवून घेणार नाहीत. ही आदर्श संबंध समजा. यापुढे कोणाला खुलाही देणार नाही.”
माध्यमांशी अनावश्यक बोलणे टाळा
माध्यमांशी अनावश्यक बोलणे टाळण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. “माध्यमांना बातम्याच हव्या असतात. तुम्ही काहीही बोललात किंवा केले, तर बातम्या होतीलच. माध्यम नेहमीच करतात; पण केवळ तुमच्याशीच बोलत नाहीत, हेही लक्षात ठेवा. तुमच्या खात्याबद्दलची चुकीची बातमी आली तर तत्काळ खुलासा करा, चार ओळी छापूनही टाका,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा ‘रुद्रावतार’ आणि वादग्रस्त मंत्र्यांचा उल्लेख
कोकाटे यांच्यासह संजय शिरसाट आणि दादा भुसे यांसारख्या मंत्र्यांची नावे यावेळी चर्चेत होती. कोकाटे यांचा विधान परिषदेतील ‘खेळावताना’ व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ते वादग्रस्त विधाने करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ‘रुद्रावतार’ धारण केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणवीस यांच्या भूमिकेला समर्थन दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोकाटे यांना अजित पवारांचा अभय, मात्र ‘टेम्पररी’ मंत्रिपदाचा इशारा
दरम्यान, अजित पवार गटाचे मंत्री कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एकही चूक न करण्याच्या’ अटीवर अभय दिल्याची माहिती आहे. विधान परिषदेत केलेल्या विधानांमुळे मंत्रिपद जाण्याची वेळ आलेल्या कोकाटे यांना अजित पवार यांनी तुम्ही अचं दिल्याचे सांगितले. मात्र, यापुढे त्यांच्या बोलण्यातून काहीही चूक झाली तरी चालेल असे लागो. असा दमही त्यांनी कोकाटे यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
Leave a Reply