मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (शुक्रवारी) मुंबई मेट्रो -3 उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अतिशय महत्त्वाच्या टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबई मेट्रो-3 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन ही मुंबईकरांसाठी मोठी भेट आहे. आरे ते वरळी हा प्रवास आता जलद आणि आरामदायी होणार असून, तिसऱ्या टप्प्यामुळे कोलाबा ते कफ परेड दरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल. मेट्रो-3 मुळे मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जागतिक दर्जाची होईल आणि शहराच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल.
लोकल ट्रेनवरील ताण कमी होणार
या टप्प्यामुळे आरे ते वरळी या भुयारी मार्गावरील प्रवास अवघ्या 36 मिनिटांत शक्य होणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी, गर्दी आणि गोंगाटापासून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. मेट्रो-3 चे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये पहिला टप्पा आरे ते बीकेसीयशस्वीपणे सुरू झाला होता. आता दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते आचार्य अत्रे वरळी नाका
पर्यंत मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या टप्प्यात धारावी, शितळादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या 6 स्थानकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करून या टप्प्याचे उद्घाटन करतील. हा टप्पा मुंबईच्या मध्यवर्ती भागातील प्रवासाला गती देईल आणि लोकल ट्रेनवरील ताण कमी करेल.
वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल
मेट्रो-3च्या दुसरा टप्पा सुरु झाल्यानंतर प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे. आरे ते वरळी हा प्रवास आता फक्त 36 मिनिटांत पूर्ण होईल. हा प्रवास सध्या रस्त्याने करण्यासाठी साधारणपणे 90-120 मिनिटे लागतात. मेट्रो-3 मुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि इतर प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वे लोकलमधील गर्दी कमी होईल. कारण अनेक प्रवासी मेट्रोला प्राधान्य देतील. सर्व स्थानकांवर आधुनिक सुविधा जसे की स्वयंचलित तिकीट यंत्रे, एस्केलेटर, लिफ्ट आणि सीसीटीव्ही उपलब्ध असतील.
Leave a Reply