सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडको घर’ योजनेतील २६ हजार घरांसाठी होणारी लॉटरी शनिवारी जाहीर होणार होती. मात्र, अवघ्या काही तास आधीच सिडकोने अचानक ही सोडत पुढे ढकलल्याने अर्जदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका प्रभावी राजकीय नेत्याच्या दबावामुळेच ही सोडत स्थगित करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
अर्जदारांच्या अपेक्षांना धक्का
सिडकोच्या या योजनेसाठी २१,५०० अर्जदारांनी अर्ज भरून अनामत रक्कमही जमा केली होती. तळोजा येथे १४ फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडतीचे आयोजन केले होते. मात्र, शनिवारी अर्जदारांना अचानक ऑनलाइन संदेश पाठवून ही सोडत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नव्या नियोजनानुसार ही सोडत आता १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ दरम्यान जाहीर केली जाणार आहे.
अर्जदार गेल्या पाच महिन्यांपासून या लॉटरीची प्रतीक्षा करत आहेत. सतत होणाऱ्या विलंबामुळे अनेकांची नाराजी वाढली आहे. अर्जदारांचे लाखो रुपये अडकले असून, दरम्यान घरांच्या किमतीही वाढवल्या गेल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवाय, सिडकोने लॉटरी पुढे ढकलण्याचे कोणतेही ठोस कारण दिले नाही, त्यामुळे पारदर्शकतेबाबत शंका निर्माण झाली आहे.
सिडकोने एक अधिकृत सूचना जारी करत “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या योजनेच्या लॉटरीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, अनेक अर्जदारांना ही माहिती उशिरा मिळाल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
Leave a Reply