मुंबई आणि ठाणे परिसरात गेल तीन दिवसांपासून CNG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून रिक्षा-टॅक्सी वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. वडाळ्यातील गेल (GAIL) कंपनीच्या मुख्य पाइपलाईनमध्ये रविवारी दुपारी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील CNG पुरवठा थांबला. अनेक CNG पंप बंद पडले, तर उघड्या पंपांवर प्रचंड रांगा लागल्या आहेत. महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की पाइपलाईन दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असून पर्यायी पुरवठाही कार्यान्वित केला आहे; मात्र पुरवठा मर्यादित असल्याने परिस्थिती अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. नवी मुंबईतील काही पंप सुरू झाले असले तरी मुंबई आणि ठाण्यात अनेक पंप अजूनही बंद आहेत. ठाण्यात दोन दिवस रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प झाल्यानंतर आता पुरवठा हळूहळू सुधारतो आहे; तरीही रांगा कमी झालेल्या नाहीत.CNG न मिळाल्याने रिक्षा-टॅक्सी चालकांचे आर्थिक नुकसान होत असून अनेकांना तासनतास रांगेत थांबावे लागत आहे. प्रवाशांनाही मोठा फटका बसला असून रिक्षा-टॅक्सी उपलब्ध नसल्याने भाडेवाढ आणि दीर्घ प्रतीक्षा यांचा सामना करावा लागत आहे. कुर्ला, ठाणे स्टेशनसह अनेक ठिकाणी प्रवासी दीर्घकाळ रिक्षा शोधताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या उशिरामुळे शैक्षणिक गैरसोयीही वाढल्या आहेत. MGL च्या पर्यायी पुरवठ्यामुळे काही प्रमाणात CNG मिळत असले तरी संपूर्ण पुरवठा पूर्ववत होण्यासाठी अजून काही वेळ लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मुंबई–ठाण्यातील नागरिक आणि चालकवर्गाला अद्याप अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई–ठाण्यात CNG पुरवठा संकट कायम; रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल वाढले
•
Please follow and like us:

Leave a Reply