कोब्रा कंमाडोंकडून म्होरक्या विवेकसह 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; 1कोटींचं होतं बक्षीस

झारखंडच्या बोकोरा जिल्ह्यातील 8 नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. CRPF चे कोब्रा कमांडो आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. नक्षली चळवळीचा म्होरक्या आणि 1 कोटी रुपयांचे पारितोषिक असलेल्या भाकपा माओदी केंद्रीय कमिटीचा सदस्य मांझी उर्फ विवेक दा याचाही खात्मा करण्यात आला आहे. मांझीला ठार केल्याने नक्षलवादी चळवळीच्या एका युगाचा अंत झाल्याचे बोलले जाते. रविवारी रात्री पोलिसांना (Police) नलक्षवाद्यांसंदर्भात खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा जवानांनी संबंधित परिसरात कोंम्बिंग ऑपरेशन राबवून 8 नलक्षवाद्यांना कंठस्नान घातले.

झारखंडच्या बोकोरा जिल्ह्यात सोमवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. त्यात, 8 नक्षलवादी ठार झाले असून एक कोटी रुपयांचा इनामी नक्षलवादी नेता विवेक याचाही खात्मा करण्यात आला आहे. ललपनिया परिसरातील लुगू टेकड्या, बोकारो जिल्हा या ठिकाणी ही चकमक झाली. सकाळी 6 वाजल्यापासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू होती. CRPF चे कोब्रा कमांडो आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाई 8 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले. त्यामध्ये, विवेक दा खात्मा हा सुरक्षा रक्षकांच्या कारवाईचं मोठं यश मानलं जात आहे. सुरक्षा जवानांच्या चकमकीत कुख्यात नक्षलवादी प्रयाग मांझी ठार झाला असून काही फरार झालेल्या नक्षलवाद्यांसाठी देखील शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.

कोण होता विवेक दा?

विवेक दा हा धनबाद जिल्ह्याच्या टुंडी येथील मानियाडेहचा मूळ रहिवासी होता. कमी वयातच त्याने नक्षल चळवळीत पदार्पण केलं होतं. त्यामुळे, आयुष्यातील मोठा काळ त्याने नक्षलवाद्यांचे नेतृत्व केलं आहे. केवळ झारखंडच नाही, तर बिहार, ओडिशा आणि छत्तीसगढच्या नक्षल चळवळीत तो सक्रीय होता. बोकारो जिल्ह्यात त्याचा मोठा प्रभाव होता. गिरीडीह येथील क्षेत्रात त्याच्या एकट्यावर 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. नक्षल चळवळीत तो एक रणनीतीकार शस्त्रप्रमुख म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे एके 47, रायफल आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकेही होती. त्याच्याकडे 50 पेक्षा जास्त नक्षलवादी होते. त्यामुळेच, सरकारने त्याच्यावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *