बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने कोट्यवधींचा निधी लाटला; प्राचार्य, लिपिकांविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: महानगरग्राममधील आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने त्यांना ‘पदनुपाद्य उपाध्यय स्वयं योजना’ अंतर्गत भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यासाठी ११ हजार रुपये दिले जातात. मात्र, या योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. शहरातील चार महाविद्यालयांमध्ये तीन शैक्षणिक वर्षांत तब्बल १४४६ बनावट विद्यार्थ्यांच्या नावांवर ६ कोटी ४३ लाख ९६ हजार १० रुपयांचा निधी लाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांच्या तक्रारीवरून महाविद्यालयांचे प्राचार्य, लिपिक, आदिवासी विभागातील लिपिक आणि बनावट लाभार्थी विद्यार्थ्यांविरोधात पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या घोटाळ्यात सामील असलेले आरोपी

* आरपीएमडीओ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व्यवस्थापनशास्त्र आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सय्यद अरशद अफसर
* प्राचार्य खातील पठाण
* लिपिक महेश रघुनाथ पाडळे
* समीर शामजी पठाण
* एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील लिपिक अविनाश मुर्डे
* ‘बनावट लाभार्थी’ संदीप रामदास गवळे
एकाच संस्थेच्या दोन महाविद्यालयांमध्ये कोट्यवधींचा अपहार:
एकाच संस्थेच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाने २०११-१२ या शैक्षणिक वर्षात १, २०१३-१४ मध्ये ३४, आणि २०१४-१५ मध्ये १०८ अशा १५१ बनावट विद्यार्थ्यांच्या नावे १,६१,६१० रुपयांचा अपहार केला.

त्याचप्रमाणे, डॉ. पी.जे. अब्दुल कलाम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने २०१२-१३ या वर्षात १, २०१३-१४ मध्ये ५३, आणि २०१४-१५ मध्ये १८० असे बनावट विद्यार्थी दाखवून १५४ विद्यार्थ्यांच्या नावांवर १,५८,८५० रुपये उकळले आहेत.

निधी वितरणाची प्रक्रिया कशी असते

सरकारी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यावर ते अर्ज महाविद्यालय प्राचार्याच्या लॉगिन आयडीमध्ये येतात. पडताळणीनंतर महाविद्यालय हे अर्ज प्रकल्प कार्यालयास अप्रुव्हल देऊन पाठवते. महाविद्यालयाकडून अर्जांची खात्री झाल्यानंतर ते अपर आयुक्तांकडे मंजुरीसाठी जातात. त्यानंतर बिल जनरेट होऊन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ११ हजार रुपये पाठविण्यात येतात. मात्र, या प्रक्रियेचा गैरवापर करत बनावट विद्यार्थ्यांच्या नावांवर हा निधी लाटण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठा खळबळ उडाली असून, या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *