कोल्हापुरी चपल बनवणाऱ्या कारागिरांना प्राडाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी

मुंबई: इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने कोल्हापुरी चपलेपासून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या फूटवेअरमुळे निर्माण झालेला वाद आता चिघळला आहे. २२ जून रोजी मिलानमधील ‘स्प्रिंग/समर मेन्स कलेक्शन’मध्ये प्राडाने हे फूटवेअर सादर केले होते. या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर, आता मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेद्वारे कोल्हापुरी चपल बनवणाऱ्या कारागिरांना प्राडाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्राडाने आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये १ लाखांहून अधिक किमतीच्या या सँडलचे प्रदर्शन केले. कंपनीने सुरुवातीला यावर मौन बाळगले होते, मात्र नंतर एक निवेदन जारी करत संबंधित उत्पादनामागील प्रेरणा भारतीय कारागिरांकडून घेतल्याचे कबूल केले. असे असले तरी, प्राडाने कोल्हापुरी चपलेचे खरे मूळ मान्य न करता, त्याचे युरोपियन लेबलखाली ‘रीब्रँड’ केले आहे. यामुळे कंपनीने भारतीय कारागिरांच्या आर्थिक आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले आहे, असे ॲड. गणेश हिंगमिरे आणि अन्य वकिलांनी जनहित याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे. प्राडाने मेन्स फॅशन शोमध्ये सादर केलेले ‘टो-रिंग’ फूटवेअर हे कोल्हापुरी चपलेची थेट कॉपी असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *