देवेंद्र फडणवीस यांना युती तोडायची नव्हती; संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

मुंबई : शिवसेना आणि भाजपची 2014 साली युती तुटल्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस हे युतीबाबत सकारत्मक होते, त्यांना युती तुटू नये, असे मनापासून वाटत होते. मात्र वरिष्ठांकडून जो कार्यक्रम आला त्यामुळे युती तुटली, असं संजय राऊत म्हणाले. राऊत इतक्यावरच थांबले नाहीत तर ते म्हणाले, बाळासाहेब हयात नाहीत, शिवसेना संपवावी असा भाजपचा हेतू होता.

नेमकं राऊत काय म्हणाले? 

संजय राऊत म्हणाले की, 2014 ते2025 या काळात पुलाखालून बरेच पाणी बाहून गेले आहे. असे असेल तर त्यांनी 2019 बद्दलही बोलले पाहिजे. 2014 ला भाजपचे ‘वरीष्ठ नेते शिवसेनेसोबत युती तोडायची हे ठरवून दिल्लीतून मुंबईत आले होते. चर्चेचे फक्त गुन्हाळ सुरू होते. मा. बाळासाहेब ठाकरे नाहीत यांचा फायदा घेत त्यांना शिवसेना संपवण्याचे त्यांचे धोरण होते. हिंदुत्ववादी आहे असे दाखवत असले तरी शिवसेना संपवण्याचे फरमान घेऊन त्यांचे नेते दिल्लीतून महाराष्ट्रत आले.

त्यांना पोस्टर लावायला जेव्हा माणसं भेटत नव्हती तेव्हा आम्ही त्यांना गावोगावी हिंदुत्ववादी म्हणून फिरवले. पारल्याच्या पोटनिवडणुकीनंतर भाजपला सतजले की महाराष्ट्रत शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे आपल्यासोबत असतील तरच आपण देशभरात हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो. म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले. मतांची विभागणी नको म्हणून बाळासाहेबांनी एकत्र काम करू असे सांगितले

बाबरी प्रकरणानंतर शिवसेना संपूर्ण देशात निवडणूक लढणार होती. तेव्हा देशात शिवसेना नावाची एक लाट निर्माण झाली होती. उत्तरप्रदेश राज्यस्थान, गुजरातसह मध्यप्रदेशात जवळपास 60 ते 65 जागा लढवणार होतो. या लाटेत तेंव्हा आमच्या जवळपास 40 जागा निवडून आल्या असत्या, अशी आम्हाला खात्री होती. आमची त्यावेळी लोकसभेची ही तयारी सुरू असताना भाजलपचे धाबे दणाणले होते. यावेळी अटलजी यांनी बाळासाहेब ठाकरेंना फोन केला, आणि म्हणाले की आपण जर निवडणूक लढवली तर हिंदुत्ववादी मताचे विभाजन होईल, आणि भाजपचा पराभव होईल. याचा केवळ काँग्रेसला फायदा होईल, आपण उमेदवार मागे घ्यावे, म्हणून अटल बिहरींचा सन्मान व्हावा म्हणून आम्ही ‘बलिदान दिले. पण 2014 ला एकाएका जागेवर 72-72 तास चर्चा चालली, असं राऊत म्हणाले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *