UPI व्यवहारात १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू: NPCI कडून महत्त्वाचे बदल जाहीर

नवी दिल्ली: जलद आणि सुरक्षित युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा सुनिश्चित करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने १ ऑगस्टपासून काही महत्त्वाचे बदल लागू करण्याची घोषणा केली आहे. या बदलांमुळे UPI प्रणाली अधिक कार्यक्षम होईल आणि सर्व्हरवरील ताण कमी होण्यास मदत मिळेल.

नियम लागू करण्यामागची कारणे

UPI व्यवहारांमध्ये सातत्याने वाढत असलेला ताण आणि वारंवार होणारे पेमेंट फेल्युअर कमी करणे, हे या बदलांमागील मुख्य कारण आहे. NPCI ला आशा आहे की, यामुळे UPI सेवा अधिक स्थिर आणि कार्यक्षम होईल.

प्रमुख बदल आणि नियम

* बँक तपासण्यांवर मर्यादा: एका UPI ॲपमधून दिवसाला जास्तीत जास्त १० वेळा बँकेची तपासणी करता येईल. सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ७ ते रात्री ९.३० या वेळेत बँकांना तपासण्यांवर मर्यादा असेल.
* प्रत्येक यशस्वी पेमेंटनंतर बँकेची माहिती: प्रत्येक यशस्वी पेमेंटनंतर ग्राहकाला बँकेची माहिती एसएमएस आणि नोटिफिकेशनद्वारे तात्काळ मिळेल. त्यामुळे पुन्हा पुन्हा बँकेत तपासणी करण्याची गरज भासणार नाही.
* लिंक केलेल्या खात्यांची माहिती: मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यांची माहिती दिवसाला फक्त २४ वेळा पाहता येईल. ही माहिती केवळ ग्राहकाने स्वतःहून निवडक परवानगी दिल्यासच दिसेल.
* ‘ऑटो पे’चे नवे वेळापत्रक: पेटीएम, एमआयएसजी, झोमॅटो यांसारख्या ऑटो पेमेंटसाठी रक्कम सकाळी १० वाजूनपूर्वी, दुपारी १ ते ५ आणि रात्री ९.३० नंतरच कमी करावी लागेल.
* पेमेंट स्टेटस पाहण्यावर मर्यादा: पेमेंट अडकले किंवा फेल झाले, तर त्याची स्थिती १० सेकंदांच्या अंतरानेच पाहता येईल. असे दिवसातून तीन वेळा करता येईल व त्यात ५० ते ६० सेकंदांचे अंतर आवश्यक असेल.

इतर महत्त्वाचे बदल:
* बँकांचे ऑडिट बंधनकारक: प्रत्येक बँकेने वर्षातून एकदा आपली प्रणाली (सिस्टीम) ऑडिट करणे बंधनकारक असेल. संबंधित पहिला अहवाल ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करावा लागेल.
* पेमेंट रिमाइंडरवर मर्यादा: वापरकर्त्याला ३० दिवसांत फक्त दहा वेळा पेमेंट रिमाइंडर पाठवता येईल. निष्क्रियता (राजकीय) विनंती करता येईल.
* सामान्य पेमेंट सेवेवर परिणाम नाही: नव्याने लागू करण्यात आलेल्या बदलांचा सामान्य पेमेंट सेवेवर (जसे पैसे ट्रान्सफर, मर्चंट पेमेंट) परिणाम होणार नाही.
NPCI च्या या पावलांमुळे UPI सेवा अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि वापरकर्त्यांसाठी सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा आहे. हे बदल १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *