बीड : नुकतंच शिवराज दिवटे या तरुणाला 10 जणांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाची झळ उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना सुद्धा बसली. परळी भेटीवर आलेल्या अजितदादांना घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. परळीमध्ये अजितदादा पवार यांच्यासमोर कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी करण्यात आली. न्याय द्या…न्याय द्या…अजितदादा न्याय द्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. परळी शासकीय विश्रामगृहासमोर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवला. यावेळी अजित पवारांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
काय आहे शिवराज दिवटे मारहाण प्रकरण?
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला अलीकडेच एका गँगकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. 8 तसं 10 जण त्याला लाठ्या, काठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण करत होते.त्याआदी शिवराज दिवटेचं अपहरण करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. इतकंच नाही तर दहशत पसरवण्यासाठी या आरोपीना पायावर डोकं ठेवायला लावून माफी मागतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल केला. त्यामुळे बीडमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही? असा सवाल विचारला जात आहे. या मारहाणीच्या व्हिडीओनंतर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात होता. बीड दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांना या संतापाला सामोरे जावे लागले आहे.
Leave a Reply