वर्षानुवर्षे प्रकल्प लटकवू नका; तीन वर्षांत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे सुरू न ठेवता ते हाती घेतल्यावर तीन वर्षांत पूर्ण झाले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांनी सोमवारी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश दिले. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी, फडणवीस यांनी ३० प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या प्रकल्पांमध्ये मुंबई मेट्रोच्या विविध लाईन्स, शिवडी-वरळी एलेक्झेंडर कॉरिडॉर, पुणे मेट्रो, दहिसर ते भाईंदर लिंक रोड, तसेच अनेक जल आणि विद्युत प्रकल्पांचा समावेश आहे.

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मेट्रो प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले. तसेच, मेट्रो प्रकल्पांच्या शेवटच्या स्थानकांजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याची सूचना केली. यासोबतच, पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच सदनिका या बैठकीत मुंबईतील हरळी बीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच सदनिका देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. नायगाव आणि एम.एम. जोशी मार्गावरील बीडीवाल्यांना सदनिका देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. पायाभूत प्रकल्पांमधील अडचणी दूर करण्यासाठी लवकरच आणखी एक आढावा बैठक घेण्याचे नियोजित आहे. या बैठकीपूर्वी नियोजित अंमलबजावणी पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *