मुंबई: महाराष्ट्र शासनाने राज्यातील शिक्षण व्यवस्थेमधील भाषिक धोरण अधिक सक्षम आणि समतोल करण्यासाठी “त्रिभाषा धोरण समिती”ची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी राज्यातील सर्व सुजाण नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
समितीने https://tribhashasamiti.mahait.org/ या संकेतस्थळावर सर्वसामान्यांसाठी प्रश्नावली उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये नागरिकांच्या अपेक्षा, सूचना आणि मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
प्रश्नावली चार गटांमध्ये विभागली असून त्यात खालील पर्यायांचा समावेश आहे:
1. मराठी माध्यमासाठी प्रश्नावली
2. इंग्रजी माध्यमासाठी प्रश्नावली
3. हिंदी माध्यमासाठी प्रश्नावली
4. इतर माध्यमांच्या शाळांसाठी प्रश्नावली
नागरिकांनी योग्य प्रश्नावली निवडून दिलेल्या पर्यायांमधून आपली उत्तरे निवडायची असून शेवटी ती सबमिट करायची आहे. याशिवाय संस्था, संघटना, शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांच्यासाठी स्वतंत्रपणे “मत” नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
समितीचे म्हणणे आहे की जनतेचा सहभाग अधिक असल्यास त्रिभाषा धोरण अधिक व्यापक आणि उपयोगी ठरेल. त्यामुळे नागरिकांनी प्रश्नावली भरून आपले मत नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply